Join us

HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?

By जयदीप दाभोळकर | Updated: June 30, 2025 11:32 IST

HDB Financial Services IPO Allotment Status : देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आयपीओपैकी एक असलेल्या एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसचा १२,५०० कोटी रुपयांचा पब्लिक इश्यू २७ जून रोजी बंद झाला.

HDB Financial Services IPO Allotment Status : देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आयपीओपैकी एक असलेल्या एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसचा १२,५०० कोटी रुपयांचा पब्लिक इश्यू २७ जून रोजी बंद झाला. दरम्यान, आता सोमवारी त्याच्या अलॉटमेंटस्टेटसला अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदार, MUFG Intime India Pvt Ltd (Link Intime) च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा बीएसई इंडियाच्या पोर्टलवर जाऊन त्यांचं अलॉटमेंट तपासू शकतात.

हा आयपीओ २५ जून रोजी खुला झाला आणि तीन दिवस खुला होता. प्रवर्तक एचडीएफसी बँकेनं २,५०० कोटी रुपयांचा नवा इश्यू आणि १०,००० कोटी रुपयांची ऑफर फॉर सेल होती. आयपीओमध्ये प्रति शेअर किंमत ७४० रुपये निश्चित करण्यात आली होती. या इश्यूला बंपर प्रतिसाद मिळाला आणि ४२.६ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले.

बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार

शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, या आयपीओला एकूण १७.६५ पट सबस्क्रिप्शन मिळालं. क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) श्रेणीमध्ये हा आकडा ५८.६४ पट, नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (NII) मध्ये १०.५५ पट आणि रिटेल इन्व्हेस्टर्स श्रेणीमध्ये १.५१ पट होता. कर्मचारी आणि शेअरहोल्डर्सच्या श्रेणींमध्येही या आयपीओला चांगला प्रतिसाद दिसून आला.

कंपनीनं आयपीओ उघडण्याच्या एक दिवस आधी म्युच्युअल फंड, विमा कंपन्या आणि जागतिक गुंतवणूकदारांकडून ३,३६९ कोटी रुपये उभारले होते, ज्यामुळे त्याला जोरदार मागणी असल्याचं दिसून येतं. ज्या गुंतवणूकदारांना अलॉटमेंट स्टेटस तपासायचं आहे ते लिंक इनटाइम वेबसाइट किंवा बीएसई वेबसाइटला भेट देऊन त्यांची स्थिती तपासू शकतात.

स्टेप १: लिंक इनटाइमच्या अधिकृत वेबसाईटवर दिसणाऱ्या https://linkintime.co.in/initial_offer/public-issues.html जा.स्टेप २: ड्रॉपडाउनमधून एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस निवडा.स्टेप ३: आपला पॅन, अॅप्लिकेशन नंबर किंवा डीपी / क्लायंट आयडी एन्टर करा.स्टेप ४: अलॉटमेंट स्टेटस पाहण्यासाठी "सर्च" वर क्लिक करा.

बीएसई वेबसाइटवर तपासण्यासाठी स्टेप्सस्टेप १: https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx वेबसाईटवर जा.स्टेप २: इश्यू टाईप म्हणून "इक्विटी" निवडा.स्टेप ३: ड्रॉपडाउनमधून "एचडीबी फायनान्शियल" निवडा.स्टेप ४: लिस्टिंग शेड्यूलनुसार तुमचा अॅप्लिकेशन नंबर आणि पॅन एन्टर करा.

ज्यांना शेअर्सचं अलॉटमेंट झालं नाही त्यांना १ जुलैपासून रिफंडची प्रोसेस सुरू केली जाईल आणि वाटप झालेल्या गुंतवणूकदारांना त्याच दिवशी त्यांच्या डिमॅट खात्यात शेअर्स जमा होतील. कंपनीच्या शेअर्सचं लिस्टिंग २ जुलै २०२५ रोजी एनएसई आणि बीएसई वर होण्याची शक्यता आहे. बाजार सूत्रांनुसार, एचडीबी फायनान्शियलचा ग्रे मार्केट प्रीमियम (जीएमपी) सुमारे ५७ रुपये आहे, जो इश्यू प्राईजपेक्षा सुमारे ८ टक्के जास्त आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक