Join us

पैसे तयार ठेवा; ६० हजार कोटींचे आयपीओ रांगेत; बीएसई, एनएसईत मोठ्या कंपन्यांचे लिस्टिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 07:50 IST

२०२४ मध्येही हा सिलसिला सुरू राहणार आहे. नव्या वर्षात तब्बल ६० हजार कोटी रुपयांचे आयपीओ प्रतीक्षेत आहेत.

नवी दिल्ली : २०२३ मध्ये शेअर बाजाराचे मेनबोर्ड म्हणजेच बीएसई आणि एनएसईमध्ये प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावाच्या (आयपीओ) माध्यमातून मोठ्या संख्येने कंपन्यांचे लिस्टिंग झाले. २०२४ मध्येही हा सिलसिला सुरू राहणार आहे. नव्या वर्षात तब्बल ६० हजार कोटी रुपयांचे आयपीओ प्रतीक्षेत आहेत.

प्राईम डाटाबेसच्या माहितीनुसार, २०२३ मध्ये मेनबोर्ड आयपीओद्वारे ५७ कंपन्यांनी सुमारे ५७ हजार कोटी रुपये उभे केले. २७ कंपन्यांना २९ हजार कोटी उभे करण्याची मंजुरी सेबीने दिली आहे. आणखी २९ कंपन्यांनी ३४ हजार कोटी उभे करण्यासाठी अर्ज केले आहेत. एकूण ८० कंपन्यांनी आयपीओसाठी यंदा सेबीकडे ड्राफ्ट फाईल केले होते. (वृत्तसंस्था) 

कोणत्या कंपन्यांचे?nपुढील वर्षी ओला इलेक्ट्रिक, स्विगी आणि फर्स्टक्राय यांसारख्या बड्या कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. या तिन्ही कंपन्या प्रत्येकी सुमारे ४ हजार कोटी रुपयांचे आयपीओ आणू शकतात. nयाशिवाय बिक्सकॅश, टाटा प्ले, इंडेजीन, ओरावेल स्टेज (ओयो), गो डिजिट जनरल इन्शुरन्स आणि टीबीओ टेक यांचे आयपीओ येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंग