Join us

बजेटच्या आधी गौतम अदानी करणार कमाल, गुंतवणूकदार होणार मालामाल; नेमकं काय करणार? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 14:18 IST

अदानी एंटरप्रायझेसने (Adani Enterprises) नोव्हेंबरच्या अखेरीस फॉलो-ऑन शेअर विक्रीची घोषणा केली होती.

अदानी एंटरप्रायझेसने (Adani Enterprises) नोव्हेंबरच्या अखेरीस फॉलो-ऑन शेअर विक्रीची घोषणा केली होती. काही बँकर्सनी सांगितले की अदानी एंटरप्रायझेस पार्टली पेड शेअर्स जारी करून FPO मध्ये पैसे उभारू शकतात. अदानी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसने सोमवारी प्रस्तावित २०,००० कोटी फॉलो-ऑन पब्लिक ऑफरचा (FPO) मसुदा कागदपत्रे स्टॉक एक्सचेंजला सादर केली. 

इकोनॉमिक टाइम्सनं दिलेल्या माहितीनुसार कंपनी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पब्लिक इश्यू लॉन्च करण्याचा विचार करत आहे. अदानी एंटरप्रायझेसने नोव्हेंबरच्या अखेरीस फॉलो-ऑन शेअर विक्रीची घोषणा केली होती. कंपनी एफपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना सूट देऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. अदानी एंटरप्रायझेसचा स्टॉक गेल्या एका वर्षात ९४ टक्के आणि गेल्या पाच वर्षांत १,७६० टक्क्यांनी वाढला आहे.

बँकर्सना लावले कामालाकंपनीने FPO साठी कागदपत्रे दाखल करून फक्त एक दिवस झाला आहे, अधिक तपशील अधिकृतपणे उघड करण्यात आलेला नाही. पण अहवालात नमूद केले आहे की अदानी एंटरप्रायझेसने जेफरीज, ICICI सिक्युरिटीज, SBI कॅपिटल, बँक ऑफ बडोदा कॅपिटल, इलारा कॅपिटल आणि काही इतर संस्थांना या इश्यूसाठी प्रमुख बँकर म्हणून नियुक्त केलं आहे.

प्रमोटर्सची भागीदारी होणार कमीएफपीओमुळे गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील प्रमोटर्सचा हिस्सा ३.५ टक्क्यांपर्यंत घसरू शकतो. सप्टेंबर २०२२ पर्यंत, प्रमोटर्सकडे अदानी एंटरप्रायझेसचे ७२.६३ टक्के, तर उर्वरित २७.३७ टक्के सार्वजनिक भागधारकांकडे होते. सार्वजनिक भागधारकांमध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा ४.०३ टक्के हिस्सा होता, तर नोमुरा सिंगापूर, एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड, इलारा इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड आणि एलटीएस इन्व्हेस्टमेंट फंड १ टक्के आणि २ टक्क्यांच्या दरम्यान होते.

कर्ज कमी होण्यास होईल मदतया एफपीओमधून मिळणारा पैसा कर्ज कमी करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. अदानी समूहाचे २.२ लाख कोटी रुपयांचे कर्ज हे कर्ज बाजारातील काही लोकांसाठी चिंतेचे कारण बनले आहे, परंतु अदानी यांनी इंडिया टुडेला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या टीकेवर उत्तर दिलं. अदानी म्हणाले की ते "आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत" आणि त्यांचा नफा कर्जाच्या तुलनेत दुपटीनं वाढत आहे.

टॅग्स :गौतम अदानी