Join us  

Closing Bell : शेअर बाजार तेजीसह बंद, टाटा स्टील वधारला; इन्फोसिस, टीसीएसमध्ये घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 3:55 PM

सोमवारी दिवसभराच्या व्यवहारात शेअर बाजारात बरेच चढउतार नोंदवले गेले. घसरणीसह उघडल्यानंतर, कामकाजाच्या अखेरीस मात्र सेन्सेक्स 105 अंकांच्या वाढीसह 72748 अंकांच्या पातळीवर झाला.

Closing Bell Today: सोमवारी दिवसभराच्या व्यवहारात शेअर बाजारात बरेच चढउतार नोंदवले गेले. घसरणीसह उघडल्यानंतर, कामकाजाच्या अखेरीस मात्र सेन्सेक्स 105 अंकांच्या वाढीसह 72748 अंकांच्या पातळीवर झाला. तर निफ्टी 50 निर्देशांक 32 अंकांच्या वाढीसह 22055 अंकांच्या पातळीवर बंद झाला. टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली तर कोफोर्जचे शेअर्स सात टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. 

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी शेअर बाजाराच्या कामकाजात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. निफ्टी फार्मा, निफ्टी ऑटो, निफ्टी बँक निर्देशांकानं वाढ नोंदवली. तर मिडकॅप 100, स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये घसरण नोंदवली गेली. 

शेअर बाजारात वाढ झालेल्या शेअर्सबद्दल सांगायचं तर, यामध्ये टाटा स्टील, महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, अपोलो हॉस्पिटल, बजाज ऑटो आणि ॲक्सिस बँक यांच्या समभागांचा समावेश होता, तर शेअर बाजारात इन्फोसिस, टीसीएस, टाटा कंझ्युमर, विप्रो, टायटन आणि एचयूएलच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 

सोमवारी दिवसभर अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.परंतु, संध्याकाळी कामकाजाच्या अखेरिस, अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये बंद झाले. 

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर पेटीएम, जिओ फायनान्शियल, एनएमडीसी, ओम इन्फ्रा, हिंदुस्तान झिंक, देवयानी इंटरनॅशनल, ॲक्सिस बँक, युनि पार्ट्स, ओएनजीसी, पटेल इंजिनियरिंग, उर्जा ग्लोबल, लार्सन अँड टुब्रो, एचडीएफसी लाईफ, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, टाटाटेक यांचे शेअर्स वधारले. तर नेस्ले, एशियन पेंट्स, सतलज जल विद्युत निगम आणि पंजाब आणि सिंध बँक यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजार