Join us  

Closing Bell : सेन्सेक्स-निफ्टी जोरदार आपटला, Bajaj Finance च्या शेअर्समध्ये तेजी, टीसीएस घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 3:52 PM

मंगळवारी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 736 अंकांनी घसरून 72012 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

मंगळवारी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 736 अंकांनी घसरून 72012 अंकांच्या पातळीवर तर निफ्टी 238 अंकांनी घसरून 21817 अंकांच्या पातळीवर बंद झाला. मंगळवारी दिवसभराच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 800 हून अधिक अंकांनी घसरला होता तर निफ्टी 21800 च्या जवळ पोहोचला होता. 

आशियाई शेअर बाजारातील कमकुवत संकेत आणि आयटी शेअर्समध्ये जोरदार विक्री यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. गेल्या 17 वर्षांत प्रथमच बँक ऑफ जपानने व्याजदरात वाढ केली आहे, त्यामुळे शेअर बाजाराच्या सेंटिमेंट्सवर परिणाम झाला आहे. 

अमेरिकेतील वाढत्या महागाई दरामुळे फेडरल रिझर्व्ह व्याजदरांबाबत यथास्थिती कायम ठेवू शकते, अशी भीती बाजारात आहे. फेडरल रिझर्व्हच्या बैठकीची आकडेवारी उद्या जाहीर केली जाईल. त्यापूर्वी आरआयएल, भारती, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि सन फार्माच्या शेअर्समध्ये मजबूती दिसून आली आहे. 

मंगळवारी दिवसभर शेअर बाजाराच्या कामकाजात घसरण दिसून आली. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 1.28 टक्क्यांनी घसरला तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकानं एक टक्क्यांहून अधिक कमजोरी नोंदवली. निफ्टी आयटी निर्देशांक सुमारे तीन टक्क्यांनी घसरला तर निफ्टी बँक, निफ्टी ऑटो आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात किंचित घसरण नोंदवली गेली. 

या शेअर्समध्ये तेजी / घसरण 

आयशर मोटर्स, कोटक बँक, एचडीएफसी बँक, हिंदाल्को आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सनंही मंगळवारच्या व्यवहारात वाढ नोंदवली. शेअर बाजारातील टॉप लूजर्सबद्दल बोलायचं तर यामध्ये टीसीएस, बीपीसीएल, सिप्ला, नेस्ले इंडिया, टाटा कंझ्युमर, ब्रिटानिया आणि इंडसइंड बँकेच्या शेअर्सचा समावेश आहे.

टॅग्स :शेअर बाजार