Join us  

Closing Bell: सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; आयशर मोटर्समध्ये बंपर तेजी, इन्फोसिस घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 4:07 PM

शेअर बाजाराच्या कामकाजात मंगळवारी मोठी घसरण नोंदवण्यात आली. बीएसई सेन्सेक्स 456 अंकांनी घसरला आणि 72943 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

Closing Bell:  शेअर बाजाराच्या कामकाजात मंगळवारी मोठी घसरण नोंदवण्यात आली. बीएसई सेन्सेक्स 456 अंकांनी घसरला आणि 72943 अंकांच्या पातळीवर बंद झाला तर निफ्टी 124 अंकांनी घसरून 22148 अंकांच्या पातळीवर बंद झाला. मंगळवारी निफ्टी आयटी निर्देशांकात 2.65 टक्क्यांची घसरण दिसून आली आणि तो 33580 च्या पातळीवर राहिला. निफ्टी बँक इंडेक्सनेही शेअर बाजाराच्या घसणीला हातभार लावला आणि तो 0.68 टक्क्यांच्या घसरणीसह 47475 च्या पातळीवर बंद झाला. 

आयशर मोटर्स, टायटन, ओएनजीसी, डिवीज लॅब, एचयूएल, एचडीएफसी बँक आणि डॉ. रेड्डीज यांच्या या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मंगळवारी तेजी दिसून आली. शेअर बाजारातील सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये इन्फोसिस, एलटीआय माइंडट्री, इंडसइंड बँक, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, हीरो मोटोकॉर्प आणि टेक महिंद्रा यांच्या शेअर्सचा समावेश होता. शेअर बाजारात घसरण असूनही, अमरा राजा बॅटरीज, एक्साइड इंडस्ट्रीज, एजिस लॉजिस्टिक्स, डीओएमएस इंडस्ट्री, गोदावरी पॉवर, ज्युबिलंट लाइफ आणि आयशर मोटर्सचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले, तर बंधन बँक, बाटा इंडिया आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे शेअर्स शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत होते. 

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती 

मंगळवारी शेअर बाजाराच्या कामकाजात निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये घसरण दिसून आली. तर निफ्टी एफएमसीजी, निफ्टी फार्मा आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक वाढीसह कार्यरत होते. शेअर बाजारात मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर सर्वोटेक पॉवर, गार्डन रीच शिप बिल्डर, डोडला डेअरी लिमिटेड, ईआयडी पॅरी, महिंद्रा हॉलिडेज, अशोक लेलँड, कोरोमंडल इंटरनॅशनल, सीएमएस इन्फो सिस्टीम्स, फिनोलेक्स केबल यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार