Join us  

६ महिन्यांपूर्वी ₹७५ वर आलेला IPO, आता ₹१००० पार शेअर, १२४०% ची तुफान तेजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 9:50 AM

कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. शुक्रवारीही शेअर्सना ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं.

बोंदडा इंजिनिअरिंगच्या  (Bondada Engineering) शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 5% च्या अपर सर्किटसह 1005 रुपयांवर पोहोचले. बोंदडा इंजिनिअरिंगच्या शेअर्सनं शुक्रवारी 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला. कंपनीच्या शेअर्सनं अवघ्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. बोंदडा इंजिनिअरिंगचा आयपीओ फक्त 6 महिन्यांपूर्वी आला होता आणि कंपनीच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना 1200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. 

बोंदडा इंजिनिअरिंगचा आयपीओ 18 ऑगस्ट 2023 रोजी उघडण्यात आला आणि तो 22 ऑगस्टपर्यंत खुला होता. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 75 रुपये होती. 30 ऑगस्ट 2023 रोजी बोंदडा इंजिनिअरिंगचे शेअर्स 142.50 रुपयांवर लिस्ट झाले. लिस्टिंग झाल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. 

बोंदडा इंजिनिअरिंगचे शेअर्स 75 रुपयांच्या इश्यू प्राईजच्या तुलनेत 1240 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 142.50 रुपये आहे. या वर्षी आतापर्यंत, बोंदडा इंजिनिअरिंगच्या शेअर्समध्ये जबरदस्त 141 टक्क्यांची वाढ झाली आहे. 1 जानेवारी 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 417.10 रुपयांवर होते, जे आता 1000 रुपयांच्या पुढे गेले आहेत. 

112 टक्क्यांपेक्षा अधिक सबस्क्राईब 

बोंदडा इंजिनिअरिंगचा आयपीओ एकूण 112.28 पट सबस्क्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 100.05 पट सबस्क्राइब झाला. त्याच वेळी, आयपीओच्या इतर कॅटेगरीमध्ये 115.46 पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. कंपनीच्या आयपीओची साईज 42.72 कोटी रुपये होती. कंपनीचे शेअर्स मुंबई शेअर बाजाराच्या SME प्लॅटफॉर्मवर लिस्ट झाले आहेत. आयपीओपूर्वी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा 86 टक्के होता, जो आता 63.33 टक्क्यांवर आला आहे. 

(टीप- यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली होती. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंग