Join us  

पैसे तयार ठेवा; एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात येतोय रु. 4000 कोटींचा IPO, पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 7:47 PM

Bharti Hexacom IPO : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे.

Bharti Hexacom IPO : शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आज आर्थिक वर्षाचा(2023-24) चा शेवटचा दिवस आहे. उद्या, 1 एप्रिल 2024 पासून नवीन आर्थिक वर्ष(2024-25) सुरू होत असून, या वर्षात अनेक IPO बाजारात येणार आहेत. विशेष म्हणजे, नवीन आर्थिक वर्षाचा पहिला आठवडा तुमच्यासाठी खास असणार आहे, पुढील आठवड्यात भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) कंपनी सबस्क्रिप्शनसाठी आपला इश्यू उघडणार आहे. या IPO चा आकार 4000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. 

3 एप्रिल रोजी आयपीओ सुरू होणारशेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी 2023-24, हे आर्थिक वर्ष उत्कृष्ट ठरले होते. उद्यापासून सुरू होणारे नवीन आर्थिक वर्षही कमाईच्या अनेक संधी देत आहे. एप्रिल 2024 च्या पहिल्या आठवड्यात, म्हणजेच 3 एप्रिल रोजी भारती हेक्साकॉमचा IPO सबस्क्रिप्शनसाठी सुरू होत आहे.

4275 कोटी रुपयांच्या IPO Bharti Hexacom IPO गुंतवणूकदारांसाठी 5 एप्रिलपर्यंत खुला असेल, म्हणजेच या तारखेपर्यंत तुम्ही इश्यूमध्ये पैसे गुंतवू शकता. कंपनीच्या IPO चा आकार रु. 4275 कोटी असून, या IPO च्या माध्यमातून कंपनी 5 रूपये दर्शनी मूल्य असलेले 7 कोटी 50 लाख शेअर्स विक्रीसाठी ऑफर करणार आहे. कंपनीने IPO साठी शेअर्सचा प्राइस बँड 542 ते 570 रुपये ठेवला आहे.

किती गुंतवणूक करावी लागेल?तुम्हाला या कंपनीत गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला IPO अंतर्गत किमान एका लॉटसाठी बोली लावावी लागेल. कंपनीने किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 26 शेअर्सचा लॉट साइज निश्चित केला आहे. म्हणजेच, एका लॉटसाठी किमान 14,820 रुपये गुंतवावे लागतील.

(टीप- हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.) 

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक