Join us

Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 11:20 IST

Anthem Biosciences IPO: अँथेम बायोसायन्सेस लिमिटेडचा आयपीओ आज म्हणजेच १४ जुलै रोजी खुला झाला आहे. जाणून घ्या या आयपीओच्या संपूर्ण डिटेल्स.

Anthem Biosciences IPO: अँथेम बायोसायन्सेस लिमिटेडचा आयपीओ आज म्हणजेच १४ जुलै रोजी खुला झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना १६ जुलैपर्यंत बोली लावता येणारे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीला ३३९५ कोटी रुपये उभे करायचे आहेत. या आयपीओमध्ये ५.९६ कोटी शेअर्सची विक्री होणार आहे.

हा आयपीओ निव्वळ ऑफर फॉर सेल (ओएफएस) आहे. म्हणजेच कंपनीचे विद्यमान भागधारक (जसं प्रवर्तक, गुंतवणूकदार किंवा इतर मोठे भागधारक) त्यांच्याकडे असलेल्या कंपनीचे शेअर्स विकणार आहेत. म्हणजेच कंपनी पैसे उभा करण्यासाठी नवे शेअर्स जारी करत नसून आधीच अस्तित्वात असलेले शेअर्स विकले जात आहेत. Anthem Biosciences IPO गुंतवणुकीसाठी आजपासून खुला झाला असून यात १६ जुलैपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. १७ जुलै रोजी शेअर्सचं अलॉटमेंट होऊ शकतं. तसंच ज्यांना हे शेअर्स मिळणार नाहीत त्यांना किंवा ज्यांना शेअर्स मिळतील त्यांच्या डीमॅट खात्यात शेअर्स १८ जुलै रोजी क्रेडिट केले जातील. २१ जुलै रोजी या शेअरचं लिस्टिंग होण्याची शक्यता आहे.

रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."

किती गुंतवणूक करावी लागणार?

अँथेम बायोसायन्सेस लिमिटेडनं आयपीओची (Anthem Biosciences IPO) प्राईज बँड ५४० ते ५७० रुपये निश्चित केली आहे. किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी एक लॉट म्हणजेच २६ शेअर्ससाठी बोली लावू शकतात. जर तुम्ही आयपीओच्या अपर प्राइस बँडवर म्हणजेच ५७० रुपयांवर १ लॉटसाठी अर्ज केला तर तुम्हाला १४,८२० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तर, किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त १३ लॉट म्हणजेच ३३८ शेअर्ससाठी अर्ज करू शकतात. यासाठी गुंतवणूकदारांना १,९२,६६० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. इन्व्हेस्टोग्रेननुसार अँथम बायोसायन्सेसचा जीएमपी १०० रुपये आहे.

कंपनी काय करते?

अँथेम बायोसायन्सेस लिमिटेड (Anthem Biosciences Limited), २००६ मध्ये स्थापन झाली असून ती फार्मास्युटिकल रिसर्च, डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग (सीआरडीएमओ) मध्ये काम करणारी कंपनी आहे. ही कंपनी मेडिसिन रिसर्च, डेव्हलप आणि उत्पादनाची संपूर्ण प्रक्रिया एकत्रितपणे चालवते. ही कंपनी जागतिक स्तरावर छोट्या बायोटेक कंपन्या आणि मोठ्या फार्मास्युटिकल कंपन्यांना सेवा पुरवते.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकइनिशिअल पब्लिक ऑफरिंग