Zerodha Kamath Brothers: ब्रोकरेज प्लॅटफॉर्म झिरोदाचे संस्थापक निखिल आणि नितीन कामथ यांनी शेअर बाजारात लिस्ट होण्यापूर्वीच एका स्टार्टअपमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलीये. त्यांनी इनक्रेड होल्डिंग्सचे २५० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केलेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, इनक्रेड फायनान्शिअल लवकरच आयपीओसाठी कागदपत्रं दाखल करण्याची शक्यता आहे. इनक्रेड या आयपीओच्या माध्यमातून ४००० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे.
इनक्रेड होल्डिंग्स हे इनक्रेड फायनान्शियल सर्व्हिसेसचे एक युनिट आहे. रिपोर्ट्सनुसार, इनक्रेड ऑक्टोबरपर्यंत आयपीओ आणू शकते. कामथ यांनीही इनक्रेड कौतुक केले आहे. "भारताची क्रेडिट इकोसिस्टम सतत वेगानं बदलत आहे. ते अधिक व्यावसायिक, अधिक डिजिटल होत आहे आणि त्याची व्याप्ती वेगानं वाढवत आहे," असं कामथ म्हणाले. "इनक्रेडसला हे समजतं. त्यांच्याकडे असलेली टीम खूप मजबूत आहे आणि तंत्रज्ञानाला प्राधान्य देते. बाजार कुठे चालला आहे, याची त्यांना कल्पना असते. या मोठ्या बदलावर त्यांच्यात गुंतवणूक केली जात आहे. कारण क्रेडिट मार्केट कोणत्याही तत्त्वांशी तडजोड न करता पुढे जाऊ शकतो, असा आमचा विश्वास आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
२०१६ पासून सुरुवात
इनक्रेड ही नव्या युगातील वित्तीय सेवा देणारी कंपनी आहे, जी २०१६ पासून भारतात कार्यरत आहे. ही कंपनी कर्ज देणं, गुंतवणूक व्यवस्थापन आणि संपत्ती व्यवस्थापन प्रदान करण्यासाठी तंत्रज्ञान आणि डेटा सायन्सचा वापर करते. याचा उद्देश लोकांना आणि व्यवसायांना सोपे, जलद आणि विश्वासार्ह आर्थिक समाधान प्रदान करणं आहे. इंनक्रेडचे मुख्यालय मुंबईत आहे. त्याचे संस्थापक भूपिंदर सिंग असून कंपनीचे चार मुख्य व्यवसाय आहेत.