Join us

सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 14:45 IST

Saving Account News: आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी लोक बँकेत बचत खातं उघडतात आणि आपले पैसे जमा करतात. त्यामुळे पैसे सुरक्षित राहतात. यासोबतच २ ते ३ टक्के व्याजदरानं परतावाही मिळतो.

Saving Account News: आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी लोक बँकेत बचत खातं उघडतात आणि आपले पैसे जमा करतात. त्यामुळे पैसे सुरक्षित राहतात. यासोबतच २ ते ३ टक्के व्याजदरानं परतावाही मिळतो. तर दुसरीकडे अनेकजण आपले पैसे बँकेच्या एफडीमध्ये गुंतवतात. बँकेच्या एफडीमध्ये तुमचे पैसे ठराविक काळासाठी लॉक केले जातात. यामध्ये तुम्हाला ६ ते ९ टक्के व्याजदरानं परतावा मिळतो. अशावेळी एफडीमध्ये पैसे टाकणं अधिक फायदेशीर ठरतं, पण पैशांची गरज असताना एफडीमधून अचानक पैसे काढणं थोडं अवघड असतं. अशातच आज आम्ही तुम्हाला एका अशा मार्गाबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या बचत खात्यातही एफडीसारखं व्याज मिळवू शकता. चला जाणून घेऊया.

स्वीप-इन-एफडी

आपण आपल्या बचत खात्यात आपल्या एफडीइतकंच व्याज मिळविण्यासाठी स्वीप-इन-एफडीचा पर्याय निवडू शकता. स्वीप-इन-एफडी ही एक ऑटो-स्वीप सेवा आहे, ज्यामध्ये जर तुमच्याकडे ठराविक मर्यादेपेक्षा जास्त पैसे असतील तर तुमचे अतिरिक्त पैसे आपोआप एफडीमध्ये जातात आणि तुम्हाला एफडीच्या व्याजदरातून परतावा मिळू लागतो. आपण आपल्या बँकेत जाऊन आपल्या बचत खात्यात स्वीप-इन-एफडीचा पर्याय निवडू शकता.

एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर

कालावधी आणि व्याजदर

प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना स्वीप-इन-एफडीमध्ये वेगवेगळी मुदत, किमान रक्कम आणि व्याजदर देते. एका ठराविक मर्यादेनंतर जेव्हा तुमच्या खात्यात एफडी मर्यादेपर्यंत अतिरिक्त पैसे असतात तेव्हा ते आपोआप एफडीमध्ये जातात. गरज पडल्यास पैसे काढायचे असतील तर तुम्ही तुमचे पैसे नॉर्मल पद्धतीनंही काढू शकता. यासाठी तुम्हाला फक्त १ टक्के व्याजदरापर्यंत दंड भरावा लागू शकतो. ही रक्कम प्रत्येक बँकेत वेगवेगळी असते.

टॅग्स :बँकगुंतवणूक