Join us

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? किंमतीतील कपातीबाबत समोर आली नवी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:17 IST

Petrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील का याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे. जाणून घ्या काय आहे सरकारची भूमिका.

Petrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील का याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे. सरकार स्वतः सध्या याबाबत सतर्क आहे आणि निर्णय घेण्यात घाई करू इच्छित नाही. रिटेल इंधनाच्या किमती कमी करण्याच्या प्रश्नावर सरकार सावध पावलं उचलत असल्याचं वृत्त आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, सरकारी अधिकारी जागतिक घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत, विशेषतः रशियन तेल आयातीवरील संभाव्य शुल्काबाबत अमेरिकेकडून येणाऱ्या संकेतांवर सरकारचं लक्ष आहे.

सीएनबीसी-टीव्ही 18 ने सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा देण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बरंच काही स्पष्ट करावं लागेल. सूत्रांनी सांगितलं की, सरकार सध्या वेट अँड वॉच धोरण अवलंबण्यास प्राधान्य देत आहे. भारत सध्या आपल्या गरजेपैकी ३५ टक्के कच्च्या तेलाची आयात रशियाकडून करतो, त्यामुळे पाश्चिमात्य निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर त्याला सवलतीच्या बॅरलचा लाभ मिळतो. मात्र, अमेरिकेकडून संभाव्य धोरणात्मक बदलांचे संकेत पाहता पुढील पावलं उचलण्यापूर्वी त्यांची अंतिम भूमिका समजून घेणं महत्त्वाचं असल्याचं अधिकाऱ्यांचं मत आहे.

सोन्याच्या दरात तेजी, चांदीचाही भाव एका झटक्यात ₹२,१७८ नं वाढला; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट दर

चिंता असूनही जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा तुटवडा नाही, असं सांगून ओपेकने दररोज १२ लाख बॅरलनं पुरवठा वाढवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारतीय तेल कंपन्या सोर्सिंग धोरणांमध्ये वैविध्य आणण्यास सक्षम आहेत, परंतु जागतिक निर्बंध आल्यास सवलतीच्या दरात कच्चं तेल मिळणे अधिक गुंतागुंतीचं होऊ शकतं. सध्या सरकार जागतिक धोरणात्मक बदल आणि ऊर्जा बाजारपेठेच्या गतिशीलतेवर बारकाईनं लक्ष ठेवून तात्काळ किंमतीतील हस्तक्षेप टाळत आहे.

टॅग्स :पेट्रोलडिझेल