Join us

पैशांशी निगडित 'या' ५ गोष्टी तुमच्या मुलांना नक्की सांगा, कधीही भासणार नाही त्यांना पैशांची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 11:06 IST

Finacial Literacy Kids : तुम्ही तुमच्या मुलांना पैशांविषयी महत्त्वाच्या गोष्टी शिकवत आहात का? मुलांची शाळा आणि शिक्षण जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच पैसे आणि पैशाशी संबंधित समजही महत्त्वाची आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Finacial Literacy Kids : तुम्ही तुमच्या मुलांना पैशांविषयी महत्त्वाच्या गोष्टी शिकवत आहात का? मुलांची शाळा आणि शिक्षण जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच पैसे आणि पैशाशी संबंधित समजही महत्त्वाची आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पालक आपल्या मुलांच्या शालेय शिक्षणाकडे लक्ष देतात, पण त्यांना पैशांशी संबंधित मूलभूत गोष्टी सांगणं त्यांना आवश्यक वाटत नाही. लहानपणापासून मुलांना या गोष्टी शिकवल्या तर त्यांना पैशाची किंमत समजेल, खर्च करताना सावधगिरी बाळगली जाईल आणि बचतीचं महत्त्व कळेल. आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहे ज्याबद्दल तुम्ही तुमच्या मुलांना सांगायला हवं.

कर्ज आणि व्याजदर - गरज असताना कर्ज घेणं ही वाईट बाब नाही. परंतु, जेव्हा आपण कर्ज घेतो तेव्हा आपल्याला व्याज भरावं लागतं, ज्याला आपण कर्जाची किंमत म्हणू शकतो. एज्युकेशन लोन, कार लोन, पर्सनल लोन, होम लोन तुमच्या आयुष्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करतात. पण या कर्जाची मोठी किंमत आपल्याला फेडावी लागते. कर्जावर आपण जे व्याज देतो ते खूप जास्त असतं. गरज असेल तेव्हाच कर्ज घ्यावं, असं मुलांनी सांगावं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

बचतीचं महत्त्व - बचत ही एक सवय आहे. ही सवय जितक्या लवकर तयार होईल तितकं चांगलं. बचतीची सवय लहानपणीच लावली तर यापेक्षा चांगलं काय असू शकतं. नियमित बचत केल्यास आपण काही वेळात भरपूर पैसे जमा करू शकतो, जे भविष्यात आपल्याला उपयोगी पडेल. अचानक पैशांची गरज पडल्यास कुणासमोर हात पसरण्याची गरजही भासणार नाही. लहानपणापासून बचतीची सवय लागली की त्याचे फायदे मुलांनाच कळू लागतात.

गुंतवणूक - बचतीतून जमा झालेले पैसे गुंतवणं अत्यंत गरजेचं आहे. आपण वाचवलेले पैसे घरात ठेवले तर त्याची किंमत दिवसेंदिवस कमी होत जाते. याचं कारण म्हणजे महागाई. महागाईचं स्वरूप काळाप्रमाणे वाढणार आहे. आजच्या अर्थव्यवस्थेत महागाई याला अपवादाप्रमाणे आहे. गुंतवणुकीमुळे पैशाचं महागाईच्या प्रभावापासून संरक्षण होतं. गुंतवणुकीवर परतावा मिळेल. हा परतावा महागाईच्या दरापेक्षा जास्त असेल तर पैशाचे मूल्य कमी होण्याऐवजी वाढू लागतं. यामुळे आपल्या पैशाचं मूल्यही वाढतं.

फायनान्शिअल प्रोडक्ट - शेअर्स, म्युच्युअल फंड, बचत खाती, रेकरिंग खाती, एफजी, बॉन्ड्स अशा आर्थिक उत्पादनांविषयी मुलांना सांगणं गरजेचं आहे. प्रत्येक आर्थिक उत्पादनाची स्वतःची एक खासियत असते. प्रत्येक उत्पादनाशी संबंधित कमी-अधिक जोखीम असते. प्रत्येक उत्पादनावर कमी-अधिक प्रमाणात परतावा मिळतो. याविषयी जाणून घेतल्यानं मुलांना प्रत्येक उत्पादनाचं महत्त्व आणि त्यांच्यातील फरक समजू लागेल.

इन्शुरन्स - विम्याला बहुतेक लोक बचतीचं साधन मानतात. परंतु, हे खरं नाही. विम्याचा उद्देश आर्थिक सुरक्षा पुरविणं हा असतो. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास जीवन विमा कुटुंबाला आर्थिक सुरक्षा पुरवतो. आपण आजारी पडल्यास आरोग्य विमा उपचारांच्या खर्चाची भरपाई करतो. यामुळे आपण बचतीचे पैसे उपचारासाठी वापरत नाही. ही दोन्ही उत्पादनं प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाची आहेत.

टॅग्स :गुंतवणूक