Sun Pharma: भारतातील आघाडीची औषधनिर्माता कंपनी Sun Pharmaceutical Industries (सन फार्मा) ने सोमवारी एक ऐतिहासिक घोषणा करत अमेरिकन कंपनी Organon & Co. चे अधिग्रहण करण्याचा निर्णय जाहीर केला. हा पूर्णपणे रोख व्यवहार असून, हा करार तब्बल $११.७५ अब्ज (सुमारे १ लाख कोटी रुपये) इतका मोठा आहे. विशेष म्हणजे, हा व्यवहार कोणत्याही भारतीय फार्मा कंपनीने केलेल्या सर्वात मोठ्या अधिग्रहणांपैकी एक आहे.
Organon चा १४० देशांमध्ये विस्तार
Organon चे व्यवसाय जाळे १४० हून अधिक देशांमध्ये पसरलेले आहे. विशेषतः महिलांचे आरोग्य, गर्भनिरोधक आणि प्रजनन उपचारांमध्ये कंपनीची मजबूत उपस्थिती आहे. या अधिग्रहणामुळे सन फार्माची प्रगत बाजारपेठांमध्ये पोहोच अधिक मजबूत होणार आहे.
व्यवसायात मोठा बदल
सन फार्मासाठी हा व्यवहार केवळ विस्तार नाही, तर व्यवसायाच्या स्वरूपात मोठा बदल घडवणारा टप्पा आहे. महिलांच्या आरोग्य क्षेत्राचा नवा ‘पिलर’ म्हणून समावेश, त्वचारोग, नेत्रविज्ञान आणि ऑन्को-डर्मेटोलॉजीसोबत संतुलित वाढ आणि बायोसिमिलर क्षेत्रात त्वरित मोठी एंट्री मिळेल.
रेव्हेन्यू जवळपास दुप्पट
या विलिनीकरणानंतर संयुक्त कंपनीचे वार्षिक उत्पन्न सुमारे $१२.४ अब्ज होण्याची अपेक्षा आहे. FY2025 मध्ये सन फार्माचा स्वतंत्र रेव्हेन्यू $६.२ अब्ज होता, तर मर्जरनंतर अपेक्षित EBITDA: $३.७ अब्ज होईल. यामुळे कंपनीचा व्यवसाय अधिक मजबूत तर होईलच, शिवाय वैविध्यही येईल.
फंडिंगची रचना
या व्यवहारासाठी निधी उभारणी दोन प्रमुख मार्गांनी केली जाणार आहे. कंपनीकडे सध्या $२.२५ अब्ज रोख रक्कम उपलब्ध आहे, तर बँकांकडून सुमारे $९.२५–९.७५ अब्ज कर्ज घेतले जाईल. व्यवस्थापनाच्या मते, एवढ्या मोठ्या व्यवहारानंतरही कर्जाचे प्रमाण नियंत्रणात राहील. नेट डेट-टू-EBITDA गुणोत्तर सुमारे १.८ पट राहण्याचा अंदाज आहे. या डीलमधून पुढील २-४ वर्षांत $३५० मिलियनपेक्षा जास्त सिनर्जी मिळण्याची अपेक्षा आहे.
Web Summary : Sun Pharma to acquire Organon for $11.75 billion. This major acquisition expands Sun Pharma's global reach, especially in women's health, and is expected to double revenue and diversify business.
Web Summary : सन फार्मा $11.75 बिलियन में Organon का अधिग्रहण करेगी। यह बड़ा अधिग्रहण सन फार्मा की वैश्विक पहुंच को बढ़ाता है, खासकर महिलाओं के स्वास्थ्य में, और इससे राजस्व दोगुना होने और व्यवसाय में विविधता आने की उम्मीद है।