Silver Return in 25 Years: सोन्याच्या चकाकीमागे चांदीनं दशकांपासून एक विश्वासार्ह गुंतवणूक म्हणून आपलं स्थान शांतपणे टिकवून ठेवलं आहे. हा मौल्यवान धातू चढ-उतार, महागाई आणि जागतिक अनिश्चिततेच्या काळातही बऱ्याच अंशी स्थिर राहिला आहे. दीर्घकाळात चांदीची कामगिरी उत्कृष्ट राहिली असून, यामुळे शेअर्स आणि बाँड्सपेक्षा वेगळा विचार करून पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांची ती पसंती ठरली आहे.
जर एखाद्या व्यक्तीनं २००० मध्ये चांदीमध्ये १०,००० रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती २५ वर्षांपर्यंत तशीच ठेवली असती, तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य २,६४,५५० रुपये झालं असतं. याचा अर्थ ही गुंतवणूक २६ पटीनं वाढली असती. हे दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे आणि काळासोबत संपत्ती सुरक्षित ठेवून ती वाढवण्याची चांदीची क्षमता दर्शवते. फोर्ब्सच्या अहवालानुसार, वर्ष २००० मध्ये भारतात चांदीची सरासरी किंमत सुमारे ७,९०० रुपये प्रति किलो होती. आज चांदी २.१७ लाख रुपये प्रति किलोच्या आसपास व्यवहार करत आहे, ज्यानं दीर्घकालीन गुंतवणूकदारांना २,६००% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.
शेअर बाजारातील अस्थिरतेमध्ये मजबूत ढाल
सोन्याप्रमाणेच चांदीनंही गेल्या चार दशकांपासून महागाई आणि बाजारातील अस्थिरतेविरुद्ध एक मजबूत ढाल म्हणून काम केलं आहे. जेव्हा जेव्हा शेअर बाजारात नकारात्मक परतावा मिळाला, तेव्हा चांदीनं गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओला स्थिरता दिली. येस बँकेच्या अलीकडील अहवालानुसार, चांदी केवळ 'सेफ हेवन' म्हणून काम करत नाही, तर ती एआय (AI) बूम, डेटा सेंटर्स, स्वच्छ ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं आणि संरक्षण कार्यक्रमांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अमेरिकेनं चांदीला एक महत्त्वपूर्ण खनिज घोषित केले आहे आणि चीनचा साठा देखील दशकाच्या नीचांकी पातळीवर आला आहे, ज्यामुळे किमतींना आधार मिळत आहे.
२०२५ मध्ये चांदीच्या किमतींचा नवा उच्चांक
२०२५ मध्ये चांदीने अभूतपूर्व पातळी गाठली आहे. मंगळवार, २३ डिसेंबर रोजी स्पॉट सिल्व्हरनं प्रथमच ७० डॉलर्सचा टप्पा पार केला. भारतात देखील एमसीएक्स (MCX) वर चांदी १.७% नं वधारून २,१६,५९६ रुपये प्रति किलोच्या नवीन शिखरावर पोहोचली. विशेष म्हणजे, या वर्षी चांदीनं परताव्याच्या बाबतीत सोन्याला मागे टाकलं आहे. स्पॉट मार्केटमध्ये सोन्यात ७६% वाढ झाली असताना, चांदीच्या किमतीत या वर्षात आतापर्यंत १४०% तेजी दिसून आली आहे.
तेजीची प्रमुख कारणं आणि भविष्यातील कल
चांदीच्या या तेजीमागे अनेक जागतिक घटक कारणीभूत आहेत. अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील भू-राजकीय तणाव, अमेरिकेतील व्याजदर कपातीची अपेक्षा आणि डॉलरची घसरण यामुळे मागणी वाढली आहे. याशिवाय, खाण कामातील व्यत्यय आणि मर्यादित साठ्यामुळे पुरवठ्यात मोठी घट झाली आहे. चांदीचा जागतिक तुटवडा प्रतिवर्षी २,५०० टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. चांदी सोन्यापेक्षा अधिक अस्थिर असली तरी, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ती एक महत्त्वपूर्ण पोर्टफोलिओ डायव्हर्सिफायर म्हणून आपली स्थिती मजबूत करत आहे.
Web Summary : Silver outperforms, delivering substantial returns. A ₹10,000 investment in 2000 would now be ₹2,64,550. Silver acts as a hedge against market volatility, fueled by AI boom, clean energy demands, and geopolitical tensions, potentially reaching new highs in 2025.
Web Summary : चाँदी का शानदार प्रदर्शन, महत्वपूर्ण रिटर्न। वर्ष 2000 में ₹10,000 का निवेश अब ₹2,64,550 होगा। चांदी बाजार की अस्थिरता के खिलाफ बचाव है, एआई बूम, स्वच्छ ऊर्जा मांगों और भू-राजनीतिक तनावों से प्रेरित होकर, 2025 में नई ऊंचाइयों पर पहुंचने की संभावना है।