Join us

चांदी १ लाखांपार, आता सोन्याची वेळ; Gold च्या किंमतीने आजही तोडले सर्व विक्रम

By जयदीप दाभोळकर | Updated: March 19, 2025 15:39 IST

Gold Silver Price Today 19 March: एमसीएक्सपाठोपाठ सराफा बाजारात आज सोन्याचा भाव नवा इतिहास रचत उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.

Gold Silver Price Today 19 March: एमसीएक्सपाठोपाठ सराफा बाजारात आज सोन्याचा भाव नवा इतिहास रचत उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. जीएसटीशिवाय पहिल्यांदाच २४ कॅरेट सोन्याचा भाव ८८,६८० रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला. चांदीचा भाव मात्र १००२४८ रुपये प्रति किलो ग्रॅम वर खुला झाला. यावर ३ टक्के जीएसटी जोडल्यास सोन्याची किंमत ९१३४० रुपये आणि चांदीची किंमत १०३२५५ रुपये आहे. चांदीच्या किंमतीनंही एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. मात्र आता सोन्याची पाळी आली आहे. तज्ज्ञांच्या मते, हाच ट्रेंड कायम राहिल्यास सोनं लवकरच लाखाच्या पुढे जाऊ शकेल.

सराफा बाजाराच्या ताज्या किंमतीनुसार, मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव मंगळवारच्या ८८,३५४ रुपयांच्या बंद भावापेक्षा ३२६ रुपयांनी वाढून ८८,६८० रुपयांवर उघडला. चांदीच्या दरात प्रति किलो १५२ रुपयांनी घसरण होऊन तो १००२४८ रुपयांवर पोहोचला.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जातात.

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे ताजे दर

आयबीजेएच्या दरानुसार २३ कॅरेट सोन्याचा भाव ३२५ रुपयांनी वाढून ८८,३२५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव दुपारी १ च्या सुमारास २९९ रुपयांनी वधारून ८१,३१ रुपयांवर खुला झाला. तर १८ कॅरेटचा भाव २४४ रुपयांनी वाढून ६६,३१० रुपये झाला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव १९१ रुपयांनी वाढून ५१,८७८ रुपये झाला.

का वाढताहेत दर?

इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे भूराजकीय आघाडीवर नवी अनिश्चितता निर्माण झाली असून, सोन्याच्या किमतींना आधार मिळालाय. त्याचबरोबर अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे व्याजदर धोरण, विकास आणि महागाईचा समतोल, डॉलर निर्देशांकातील घसरण, मध्यवर्ती बँकांची सोन्याची खरेदी, भारत आणि चीनकडून वाढलेली मागणी हीदेखील सोन्याच्या दरात वाढ होण्याची कारणं आहेत.

टॅग्स :सोनंचांदी