Join us
Daily Top 2Weekly Top 5

₹१००० चे बनतील ₹५.३२ लाख, PPF च्या 'या' फॉर्म्युलानं जमेल पैसा; कसा घ्याल फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 13:54 IST

तुम्ही छोट्या गुंतवणूकीतूनही पीपीएफच्या माध्यमातून भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करू शकता.

तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाची खासियत, लोकप्रियता आणि त्यात मिळणारं व्याज याबद्दल ऐकलं असेलच. ही योजना सर्व भारतीय नागरिकांसाठी आहे. हेच कारण आहे की ते सर्वात लोकप्रिय मानलं गेलंय. पण, त्यात उपलब्ध असलेले फायदे या योजनेला अधिक आकर्षक बनवतात. जरी बँका किंवा पोस्ट ऑफिस स्वतः पीपीएफमधील गुंतवणुकीचे फायदे समजावून सांगत असल्या तरी अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांची गुंतवणूकदाराला माहिती नसते. मग ती व्याज असो वा करमुक्त गुंतवणूक किंवा मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम. पीपीएफ प्रत्येक बाबतीत एक उत्कृष्ट गुंतवणूक साधन आहे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षे आहे. पण, १५ वर्षांनंतरचा फॉर्म्युला मोठा फंड तयार करतो. जाणून घेऊया काय आहे हा फॉर्म्युला...प्रथम ३ परिस्थिती समजून घ्या. या योजनेचा सर्वात मोठा फायदा असा आहे की तुम्ही त्यात मुदतपूर्तीनंतर पैसे गुंतवले किंवा नाही, व्याज मिळत राहील. पीपीएफ खात्याच्या मॅच्युरिटीवर असे एकूण ३ पर्याय आहेत. यापैकी कोणताही पर्याय निवडून तुम्ही तुमचे पैसे आणखी वाढवू शकता.

१५ वर्षांनंतर पैसे काढू शकतापीपीएफ खात्याच्या मॅच्युरिटीवर, तुम्ही त्यात जमा केलेली रक्कम आणि त्यावर मिळणारे व्याज काढू शकता. हा पहिला पर्याय आहे. खातं बंद झाल्यास, तुमचे संपूर्ण पैसे तुमच्या खात्यात हस्तांतरित केले जातील. विशेष बाब म्हणजे मॅच्युरिटीवर मिळणारे पैसे आणि व्याज पूर्णपणे करमुक्त असेल. तसंच, तुम्ही जितके वर्षे गुंतवणूक केली आहे यावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही.

५-५ वर्षांसाठी मुदत वाढवादुसरा फायदा किंवा पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या खात्याची मुदत मॅच्युरिटीनंतर वाढवू शकता. ही मुदत ५-५ वर्षांच्या कालावधीसाठी वाढवता येईल. परंतु, हे लक्षात ठेवा की तुम्हाला पीपीएफ खात्याच्या मॅच्युरिटीच्या १ वर्ष आधी मुदतवाढीसाठी अर्ज करावा लागेल. मात्र, मुदतवाढीदरम्यान तुम्ही पैसे काढू शकता. यामध्ये प्री-मॅच्युअर विड्रॉलचे नियम लागू होत नाहीत.

गुंतवणूकीशिवाय कालावधी वाढवापीपीएफ खात्याचा तिसरा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुम्ही वरील दोन पर्याय निवडले नसले तरी, तुमचं खातं मॅच्युरिटीनंतरही चालू राहील. यामध्ये तुम्ही गुंतवणूक केलीच पाहिजे असंही नाही. मॅच्युरिटीचा कालावधी आपोआप ५ वर्षांनी वाढेल. चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यात व्याज मिळत राहील. येथे ५-५ वर्षांची मुदतवाढही लागू होऊ शकते.

कसा जमेल ५.३२ लाखांचा निधीसध्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये ७.१ टक्के व्याज दिलं जात आहे. जर तुम्ही या व्याजदरासह १५ किंवा २० वर्षे गुंतवणूक केली तर तुम्ही खूप मोठा फंड तयार करू शकता. जर तुम्ही महिन्याला १ हजार रुपयांची गुंतवणूक केली तर १५ वर्षांत तुम्हाला ३.२५ लाख आणि २० वर्षांत ५.३२ लाख रुपये मिळतील. तर महिन्याला २ हजारांच्या गुंतवणूकीवर तुम्हाला १५ वर्षांनी ६.५० लाख आणि २० वर्षांनी १०.६५ लाख रुपये, त्याच प्रमाणे महिन्याला ५ हजार रुपयांची गुंतवणूक केली तर १५ वर्षांत तुम्हाला १६.२७ लाख रुपये आणि २० वर्षांत २६.६३ लाख रुपयांचा निधी मिळेल.

(टीप - यात दिलेली रक्कम अंदाजे देण्यात आलेली आहे. पीपीएफवरील व्याजदरात दर ३ महिन्यांनी बदल होतात. त्यामुळे मिळणाऱ्या रकमेतही बदल होऊ शकतो.)

टॅग्स :पीपीएफगुंतवणूक