Join us

Post Office नं या स्कीमच्या व्याजदरात केली कपात, पाहा आता किती मिळणार रिटर्न

By जयदीप दाभोळकर | Updated: July 16, 2025 14:36 IST

Post Office Savings Schemes: पोस्ट ऑफिसनं अखेर बचत योजनांवरील व्याजदरात कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केल्यानंतर पोस्ट ऑफिसनं व्याजदरात अखेर कपात केली आहे. पाहा नवे दर.

Post Office Savings Schemes: पोस्ट ऑफिसनं अखेर बचत योजनांवरील व्याजदरात कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केल्यानंतर पोस्ट ऑफिसनं व्याजदरात अखेर कपात केली आहे, तर देशातील सर्व बँकांनी रेपो दरात कपात करताच एफडीवरील व्याजदरात कपात करण्यास सुरुवात केली होती. रिझर्व्ह बँकेनं या वर्षी रेपो दरात १.०० टक्के कपात केली. आरबीआयनं ही कपात तीन वेळा केली. रिझर्व्ह बँकेनं प्रथम फेब्रुवारीमध्ये रेपो दरात ०.२५ टक्के, नंतर एप्रिलमध्ये ०.२५ टक्के आणि नंतर जूनमध्ये ०.५० टक्के कपात केली.

८ वर्षांत पहिल्यांदाच GST मध्ये होणार बदल! PMO नं प्रस्तावाला दिली मंजुरी; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

टाईम डिपॉझिटचे व्याजदर कमी केले

पोस्ट ऑफिसनं त्यांच्या टीडी म्हणजेच टाईम डिपॉझिट स्कीमचे व्याजदर कमी केले आहेत. पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांसाठी टीडी खाती उघडली जातात. पूर्वी, पोस्ट ऑफिस १ वर्षाच्या टीडीवर ६.९ टक्के, २ वर्षाच्या टीडीवर ७.० टक्के, ३ वर्षाच्या टीडीवर ७.१ टक्के आणि ५ वर्षाच्या टीडीवर ७.५ टक्के व्याज मिळत होतं. तथापि, या ताज्या बदलानंतर, आता १ वर्ष, २ वर्षे आणि ३ वर्षांच्या तिन्ही कालावधीच्या टीडीवर फक्त ६.९ टक्के व्याज मिळेल.

आताही बँकांपेक्षा अधिकच व्याज

पोस्ट ऑफिसनं टीडीवरील व्याजदर कमी केले असले तरी, ते देशातील आघाडीच्या बँकांकडून एफडीवर दिल्या जाणाऱ्या व्याजदरांपेक्षा जास्त आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक - एसबीआय आपल्या ग्राहकांना १ वर्षाच्या एफडीवर ६.२५ ते ६.७५ टक्के, २ वर्षाच्या एफडीवर ६.४५ ते ६.९५ टक्के आणि ३ वर्षाच्या एफडीवर ६.३० ते ६.८० टक्के व्याज देत आहे. बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर सामान्य नागरिकांपेक्षा ०.५० टक्के जास्त व्याज देतात, तर पोस्ट ऑफिस आपल्या सर्व ग्राहकांना समान व्याज देते.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक