Join us

म्युच्युअल फंडला लाेकांची पसंती; गेल्या २ वर्षातील सर्वाधिक गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 06:02 IST

एकाच महिन्यात २१ हजार काेटी ओतले

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि चांगला परतावा मिळण्याच्या दृष्टिकाेनातून गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडकडे ओढा सतत वाढत आहे. इक्विीट म्युच्युअल फंडमध्ये जानेवारी २०२४ मध्ये २१ हजार ७८० काेटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली आहे. 

गेल्या दाेन वर्षांतील ही सर्वाधिक गुंतवणूक आहे. गुंतवणूकदारांनी स्माॅल कॅप फंडला प्राधान्य दिले आहे. असाेसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियातर्फे ही माहिती देण्यात आली.

मार्च २०२२     २८,४६३ काेटी रुपयेडिसेंबर २०२३     १७,००० काेटी रुपयेजाने. २०२४     २१,७८० काेटी रुपये

टॅग्स :गुंतवणूकमुंबईव्यवसाय