Join us
Daily Top 2Weekly Top 5

NPS मध्ये मोठा बदल; ₹5000 च्या गुंतवणुकीवर मिळतील ₹92 लाख अन् मासिक पेन्शन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:25 IST

खासगी कर्मचाऱ्यांना 80% एकरकमी रक्कम काढता येणार!

NPS Investment Scheme: पेंशन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) ने नॅशनल पेंशन सिस्टिम (NPS) अंतर्गत खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी नियमात मोठा बदल केला आहे. नव्या नियमानुसार आता नॉन-गव्हर्नमेंट सेक्टरमधील गुंतवणूकदारांना रिटायरमेंटवेळी एकूण कॉर्पसमधील 80 टक्के रक्कम एकरकमी काढता येणार आहे, तर 20 टक्के रकमेवर मासिक पेन्शन मिळणार आहे. यापूर्वी NPS मध्ये 60% एकरकमी आणि 40% अ‍ॅन्युइटी असा नियम होता.

नियम बदलाचा परिणाम काय?

या बदलामुळे रिटायरमेंटनंतर हातात मिळणारी एकरकमी रक्कम वाढेल, मात्र मासिक पेन्शनचे उत्पन्न कमी होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आर्थिक नियोजन अधिक काळजीपूर्वक करणे गरजेचे ठरणार आहे.

₹5,000 मासिक गुंतवणुकीचे गणित

मासिक गुंतवणूक: ₹5,000

वार्षिक गुंतवणूक: ₹60,000

NPS वर सरासरी परतावा: 10%

निवृत्ती वय: 60 वर्षे

अ‍ॅन्युइटीवरील परतावा: 6% (सरासरी)

वय 30 पासून गुंतवणूक केल्यास

गुंतवणूक कालावधी: 30 वर्षे

एकूण गुंतवणूक: ₹18 लाख

एकूण कॉर्पस: सुमारे ₹1.15 कोटी

नव्या नियमानुसार:

80% एकरकमी रक्कम: सुमारे ₹92 लाख

20% अ‍ॅन्युइटीसाठी: सुमारे ₹23 लाख

₹23 लाखांच्या अ‍ॅन्युइटीवर 6% परतावा गृहित धरल्यास, दरमहा सुमारे ₹11,000 ते ₹12,000 पेन्शन मिळू शकते.

वय 40 पासून गुंतवणूक केल्यास

गुंतवणूक कालावधी: 20 वर्षे

एकूण गुंतवणूक: ₹12 लाख

एकूण कॉर्पस: सुमारे ₹48–50 लाख

रिटायरमेंटनंतर:

एकरकमी रक्कम: ₹38–40 लाख

अ‍ॅन्युइटीसाठी: ₹9–10 लाख

यावरून दरमहा सुमारे ₹4,500 ते ₹5,000 पेन्शन मिळू शकते.

(टीप: वरील आकडे अंदाजे असून बाजारातील परतावा व अ‍ॅन्युइटी दरानुसार प्रत्यक्ष रक्कम बदलू शकते.)

English
हिंदी सारांश
Web Title : NPS Big Change: ₹5000 Investment Yields ₹92 Lakhs & Pension

Web Summary : PFRDA allows NPS investors to withdraw 80% lump sum at retirement, reducing monthly pension. A ₹5,000 monthly investment can yield ₹92 lakhs with a pension of ₹11,000-₹12,000 if started at age 30, impacting retirement planning.
टॅग्स :गुंतवणूकनिवृत्ती वेतन