Mutual Fund SIP: आजच्या काळात दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड SIP (Systematic Investment Plan) हा सर्वात लोकप्रिय पर्याय ठरत आहे. नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास SIP च्या माध्यमातून कोटींचा फंड उभारणे शक्य आहे. योग्य नियोजन केल्यास १० कोटी रुपयांचा निधी देखील तयार करता येऊ शकतो.
SIP चे फायदे
SIP म्हणजे दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणे. यामुळे कमी रकमेपासून गुंतवणुकीची सुरुवात करता येते, दीर्घकालीन गुंतवणुकीत कंपाउंडिंगचा फायदा मिळतो आणि बाजारातील चढ-उतारांचा प्रभाव कमी होतो. तज्ज्ञांच्या मते, दीर्घकालीन गुंतवणुकीत SIP वर सरासरी सुमारे १२% परतावा मिळू शकतो. मात्र हा परतावा बाजारस्थितीनुसार कमी-जास्त होऊ शकतो.
१० कोटींचा फंड तयार करण्यासाठी किती वेळ लागेल?
जर तुम्हाला सरासरी १२% परतावा मिळत असेल, तर खालीलप्रमाणे SIP आणि कालावधी लागतो:
₹१०,००० मासिक SIP - सुमारे ३८ वर्षे ७ महिने₹२०,००० मासिक SIP - सुमारे ३२ वर्षे ११ महिने₹३०,००० मासिक SIP - सुमारे २९ वर्षे ७ महिने₹५०,००० मासिक SIP - सुमारे २५ वर्षे ६ महिने₹१,००,००० मासिक SIP - सुमारे २० वर्षे १ महिना
स्टेप-अप SIP द्वारे कालावधी कमी करा...
लवकर मोठा फंड तयार करायचा असेल तर स्टेप-अप SIP हा अधिक प्रभावी पर्याय मानला जातो. यात दरवर्षी SIP रक्कम ५% ते १०% ने वाढवली जाते. सुरुवातीला कमी गुंतवणूक करूनही पुढे मोठा फंड तयार करता येतो.
उदाहरणार्थ: साध्या ₹२०,००० SIP ने १० कोटींसाठी ३२ वर्षांपेक्षा जास्त वेळ लागतो. पण स्टेप-अप SIP वापरल्यास तोच फंड २६ वर्षात तयार होऊ शकतो.
(टीप - यामध्ये केवळ एसआयपीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Summary : SIPs offer a popular way to build wealth long-term. Consistent investing and step-up strategies can potentially create a ₹10 crore fund, though time varies based on investment amount and market returns. Consult experts before investing.
Web Summary : SIP दीर्घकालिक संपत्ति बनाने का एक लोकप्रिय तरीका है। लगातार निवेश और स्टेप-अप रणनीतियाँ संभावित रूप से ₹10 करोड़ का फंड बना सकती हैं, हालांकि समय निवेश राशि और बाजार के रिटर्न के आधार पर अलग-अलग होता है। निवेश से पहले विशेषज्ञों से सलाह लें।