Join us

Mukesh Amabani: जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत अंबानी, पण अदानींच्या अद्यापही मागेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 09:55 IST

जगातील 9 व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती म्हणून मुकेश अंबानींचं नाव यादीत झळकलं आहे. 

नवी दिल्ली - जगभरातील अब्जाधीश लोकांच्या यादीत मंगळवारी पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. देशातील गर्भश्रीमंत आणि जगभरातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत असलेल्या मुकेश अंबानी यांना या नव्या यादीत स्थान मिळालं आहे. काही काळ प्रतिक्षा केल्यानंतर आता टॉप 10 च्या यादीत 09 व्या नंबरवर येत मुकेश अंबानींनी आगेकुच केली आहे. जगातील 9 व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती म्हणून मुकेश अंबानींचं नाव यादीत झळकलं आहे. 

फोर्ब्सच्या रियल टाइम यादीनुसार, रिलायन्स इंड्रस्ट्रीजचे चेअरमन आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे गर्भश्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानीच्या संपत्तीत गेल्या 24 तासांत तब्बल 1.5 अब्ज डॉलर्सचा फायदा झाला आहे. त्यामुळे, त्यांच्या संपत्तीत वाढ होऊन मुकेश अंबानींची एकूण संपत्ती आता 95.9 अब्ज डॉलर एवढी झाली आहे. अंबानींच्या या बढतीमुळे त्यांनी अब्जाधीश सग्नेई ब्रिन यांना मागे टाकत हे 9 वे स्थान पटकावले आहे. 

अदानी आशियात नंबर 1, अंबानी मागेच

जगातील टॉप 10 अब्जाधींशांच्या यादीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानी यांनी 4 थे स्थान पटकावले आहे. मंगळवारी यासंदर्भातील बातमी लिहिण्यात येईपर्यंत अदानी यांची एकूण संपत्ती 138.6 अब्ज डॉलर्स एवढी होती. दरम्यान, टॉप अब्जाधीश उद्योगपतींच्या 2022 च्या यादीत गौतम अदानी हे जेफ बेजोस, एलन मस्क यांसह अनेकांच्या पुढे होते. 

टॅग्स :मुकेश अंबानी