Join us
Daily Top 2Weekly Top 5

LIC ची दमदार योजना; एकदाच पैसे गुंतवा अन् आयुष्यभर दरमहा मिळवा ₹१०,०००

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 14:18 IST

या योजनेवर शेअर बाजारातील हालचालींचा कोणताही परिणाम होत नाही.

LIC Best Pension Plan: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या Life Insurance Corporation of India (LIC) च्या विविध विमा व गुंतवणूक योजना गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. त्यापैकी LIC स्मार्ट पेन्शन योजना ही नियमित आणि हमखास उत्पन्न देणारी योजना म्हणून विशेष चर्चेत आहे. ही योजना Immediate Annuity Plan प्रकारातील असून, एकदाच (वन-टाइम) गुंतवणूक केल्यानंतर लगेचच पेन्शन सुरू होते आणि ती आयुष्यभर मिळते. ही योजना सिंगल तसेच पती-पत्नींसाठी जॉइंट ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

हमखास उत्पन्नासाठी सुरक्षित पर्याय

LIC स्मार्ट पेन्शन योजना ही विशेषतः अशा गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त आहे, जे शेअर बाजारातील चढ-उतारांपासून दूर राहून शून्य जोखीम आणि निश्चित उत्पन्न शोधत आहेत. ही योजना Non-Linked आणि Non-Participating असल्यामुळे बाजारातील हालचालींचा यावर कोणताही परिणाम होत नाही.

या योजनेत किमान अ‍ॅन्युटी खरेदी रक्कम ₹1 लाख, तर कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. म्हणजेच, गुंतवणूकदार आपल्या क्षमतेनुसार कितीही रक्कम गुंतवू शकतो.

पॉलिसी घेतानाच ठरते पेन्शन

या योजनेत पॉलिसी घेतानाच पेन्शनची रक्कम निश्चित होते आणि ती आजीवन मिळते. गुंतवणूकदार आपल्या गरजेनुसार मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक पेन्शनचा पर्याय निवडू शकतो. याशिवाय, दरवर्षी 3% किंवा 6% दराने पेन्शन वाढवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मृत्यूनंतर गुंतवलेली रक्कम वारसाला परत मिळण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे.

कोणासाठी उपयुक्त?

ही योजना विशेषतः निवृत्त सरकारी कर्मचारी, खासगी नोकरीतील कर्मचारी, वरिष्ठ नागरिक यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 

₹10,880 मासिक पेन्शन कशी मिळेल?

LIC स्मार्ट पेन्शन योजनेअंतर्गत जर दरमहा ₹10,000 पेक्षा जास्त उत्पन्न हवे असेल, तर त्याचे गणित सोपे आहे.

LIC कॅल्क्युलेटरनुसार –

एकरकमी गुंतवणूक: ₹20 लाख

वार्षिक पेन्शन: ₹1,36,000

याचे विभाजन असे:

सहामाही: ₹66,640

तिमाही: ₹32,980

मासिक: ₹10,880

LIC स्मार्ट पेन्शन योजना ही सुरक्षित, हमखास आणि आयुष्यभर उत्पन्न देणारी योजना असून, निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य हवे असलेल्या नागरिकांसाठी ती एक मजबूत पर्याय ठरू शकते. 

(नोट- कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

English
हिंदी सारांश
Web Title : LIC Pension Plan: Invest Once, Get ₹10,000 Monthly for Life.

Web Summary : LIC's Smart Pension plan offers a secure, fixed income for life with a one-time investment. It's ideal for those seeking stable returns post-retirement, with options for monthly, quarterly, or annual payouts. A ₹20 lakh investment can yield ₹10,880 monthly.
टॅग्स :एलआयसीगुंतवणूक