LIC : कमी गुंतवणुकीत सुरक्षित आणि दीर्घकालीन परतावा हवा असेल, तसेच कुटुंबासाठी आयुष्यभर संरक्षण हवे असेल, तर भारतीय जीवन विमा महामंडळाची (LIC) ‘जीवन आनंद’ (Jeevan Anand) पॉलिसी उत्तम पर्याय आहे. अवघ्या 1400 रुपये मासिक बचतीतून सुमारे 25 लाख रुपयांचा निधी उभारता येतो. विशेष म्हणजे, मॅच्युरिटीची रक्कम मिळाल्यानंतरही 5 लाख रुपयांचे जोखीम संरक्षण आयुष्यभर सुरू राहते.
विश्वासार्हतेचा वारसा
LIC ही देशातील सर्वात जुनी आणि विश्वासार्ह विमा संस्था मानली जाते. सुरक्षित गुंतवणूक आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी आजही कोट्यवधी भारतीय LICवर विश्वास ठेवतात. ‘जीवन आनंद’ ही पॉलिसी टर्म इन्शुरन्स आणि सेव्हिंग्स प्लॅन यांचे संतुलित मिश्रण असून, दुहेरी लाभ देते.
कमी प्रीमियम, मोठा फायदा
उदाहरणार्थ, वय 35 वर्षे आणि 5 लाख रुपयांचा सम अश्योर्ड निवडल्यास, 35 वर्षांच्या टर्मसाठी वार्षिक प्रीमियम सुमारे 16,3000 रुपये येतो.
मासिक प्रीमियम : सुमारे 1400 रुपये
दररोजची बचत : अंदाजे 45-46 रुपये
या कालावधीत एकूण गुंतवणूक सुमारे 5.70 लाख रुपये होते. सध्याच्या बोनस दरांनुसार मॅच्युरिटीवेळी सुमारे 25 लाख रुपये एकरकमी मिळू शकतात. यात:
बेसिक सम अश्योर्ड : 5 लाख रुपये
वेस्टेड सिंपल रिव्हिजनरी बोनस : सुमारे 8.60 लाख रुपये
फायनल अॅडिशनल बोनस : सुमारे 11.50 लाख रुपये
आयुष्यभर संरक्षणाचा अनोखा लाभ
या पॉलिसीची सर्वात मोठी खासियत म्हणजे ‘होल लाइफ कव्हरेज’. बहुतांश विमा पॉलिसी मॅच्युरिटीनंतर संपतात; मात्र ‘जीवन आनंद’मध्ये तसे होत नाही. मॅच्युरिटीला 25 लाख रुपये मिळाल्यानंतरही 5 लाख रुपयांचे जोखीम कव्हर आयुष्यभर कायम राहते. म्हणजेच, भविष्यात कधीही (अगदी 100 वर्षांच्या वयातसुद्धा) पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नामनिर्देशित व्यक्तीला 5 लाख रुपये स्वतंत्रपणे दिले जातात. त्यामुळे ही पॉलिसी दोन वेळा लाभ देते, एकदा जिवंतपणी आणि दुसऱ्यांदा मृत्यूनंतर कुटुंबासाठी.
करसवलत आणि अतिरिक्त सुविधा
कलम 80C अंतर्गत भरलेल्या प्रीमियमवर करसवलत
कलम 10(10D) अंतर्गत मॅच्युरिटी रक्कम व डेथ बेनिफिट पूर्णपणे करमुक्त
2 वर्षांनंतर कर्ज सुविधा उपलब्ध
ग्रेस पीरियड : मासिक प्रीमियमसाठी 15 दिवस, अन्य मोडसाठी 30 दिवस
कोणासाठी उपलब्ध?
ही पॉलिसी 18 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्तींना उपलब्ध आहे. टर्म 15 ते 35 वर्षे निवडता येतो. तसेच अपघाती मृत्यू व क्रिटिकल इलनेससारखे रायडर्स जोडून संरक्षण अधिक मजबूत करता येते.
(टीप- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)
Web Summary : LIC's Jeevan Anand plan offers lifetime insurance and savings. Invest ₹1400 monthly to potentially receive ₹25 lakhs upon maturity. A ₹5 lakh risk cover continues even after maturity, providing lasting financial security and benefits for the family.
Web Summary : एलआईसी की जीवन आनंद योजना आजीवन बीमा और बचत प्रदान करती है। हर महीने ₹1400 का निवेश करके परिपक्वता पर संभावित रूप से ₹25 लाख प्राप्त करें। परिपक्वता के बाद भी ₹5 लाख का जोखिम कवर जारी रहता है, जो परिवार के लिए स्थायी वित्तीय सुरक्षा प्रदान करता है।