Join us
Daily Top 2Weekly Top 5

१०० वर्षांपर्यंत उत्पन्नाची हमी! LIC चा ‘जीवन उमंग’ की ‘जीवन उत्सव’, कोणता प्लान फायदेशीर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 18:15 IST

LIC Scheme: स्थिर उत्पन्न आणि सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास हा प्लान फायदेशीर ठरेल.

LIC Scheme: स्थिर उत्पन्न आणि सुरक्षित गुंतवणूक हा प्रत्येकाला हवी असते. शेअर बाजारातील चढ-उतार टाळून दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी अनेकजण विमा-आधारित गुंतवणुकीकडे वळतात. अशा गुंतवणूकदारांसाठी भारतीय जीवन विमा निगम, म्हणजेच LIC चे ‘जीवन उमंग’ आणि ‘जीवन उत्सव’ हे दोन प्लान फायदेशीर ठरू शकतात. हे दोन्ही प्लान १०० वर्षांपर्यंत रिस्क कव्हर देतात. मात्र, कोणता प्लॅन अधिक फायदेशीर आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

‘जीवन उमंग’ प्लान: दीर्घकालीन स्थिर उत्पन्नासाठी

‘जीवन उमंग’ हा प्लान दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणुकीसाठी तयार करण्यात आला आहे. हा प्लान घेण्यासाठी किमान वय ०, तर कमाल ५५ वर्षे आवश्यक आहे. या प्लानमध्ये किमान सम एश्योर्ड २ लाख रुपये असून, प्रीमियम कालावधी १५, २०, २५ किंवा ३० वर्षे आहे.

प्लानची मुख्य वैशिष्ट्ये

प्रीमियम पूर्ण झाल्यावर दरवर्षी सम एश्योर्डच्या ८% रक्कम आयुष्यभर मिळते. यात एका वर्षानंतर लोन किंवा सरेंडर सुविधादेखील उपलब्ध आहे. महत्वाचे म्हणजे, पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला सम एश्योर्ड + बोनस + FAB (Final Addition Bonus) दिला जातो.

‘जीवन उत्सव’ प्लान: कमी कालावधीत जास्त उत्पन्न

जर कमी काळात प्रीमियम भरून जास्त नियमित उत्पन्न हवे असेल, तर ‘जीवन उत्सव’ योग्य पर्याय ठरू शकतो. या प्लानसाठीही किमान वयाची अट नाही. मात्र, कमाल वय ६५ वर्षे असणे आवश्यक आहे. या प्लानमधील किमान सम एश्योर्ड ५ लाख रुपये असून, या प्लानचा प्रीमियम कालावधी ५ ते १६ वर्षे आहे.

प्लानची मुख्य वैशिष्ट्ये

प्रीमियम पूर्ण झाल्यानंतर २ वर्षांनी दरवर्षी १०% उत्पन्न सुरू होते. तर, दोन वर्षांनंतर लोन किंवा सरेंडर सुविधा उपलब्ध आहे. या पॉलिसीत मृत्यूनंतर सम एश्योर्ड + गॅरंटीड अ‍ॅडिशन दिले जाते. 

उदाहरणातून समजून घ्या फरक

समजा, एखाद्या व्यक्तीचे वय ३५ वर्षे आहे आणि तो आपल्या ८ वर्षांच्या मुलासाठी १० लाख सम एश्योर्ड घेतो, प्रीमियम कालावधी १५ वर्षे आहे.

जीवन उमंग:-

वार्षिक प्रीमियम: ₹८१,७७४एकूण गुंतवणूक: ₹१२.२६ लाखवार्षिक उत्पन्न: ₹९६,००० (आयुष्यभर)मृत्यू लाभ (५० व्या वर्षी): सुमारे ₹५६ लाख (बोनससह)

जीवन उत्सव:-

वार्षिक प्रीमियम: ₹६६,१७३एकूण गुंतवणूक: ₹९.९२ लाखवार्षिक उत्पन्न: ₹१ लाख (आयुष्यभर)मृत्यू लाभ (५० व्या वर्षी): सुमारे ₹१६ लाख

(टीप- येथे फक्त प्लॅनविषयी माहिती देण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदय घ्या.)

English
हिंदी सारांश
Web Title : LIC Jeevan Umang vs. Jeevan Utsav: Which Plan is Better?

Web Summary : LIC's Jeevan Umang and Jeevan Utsav offer stable income until age 100. Umang provides 8% of sum assured annually after premium payment; Utsav gives 10% after two years. Choose based on investment goals and risk appetite.
टॅग्स :एलआयसीगुंतवणूक