Join us  

LICची 'ही' स्कीम करेल मुलीचं भविष्य सुरक्षित, मॅच्युरिटीवर २६ लाख; कर बचत, लोन सुविधा आणि बरंच काही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 1:05 PM

प्रत्येक पालकांना कन्येच्या भविष्याची काळजी असते. त्यांच्या भविष्याचा विचार करून पालक आर्थिक गुंतवणूकही करत असतात. एलआयसीनंही मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पॉलिसी आणलीये.

प्रत्येक पालकांना कन्येच्या भविष्याची काळजी असते. त्यांच्या भविष्याचा विचार करून पालक आर्थिक गुंतवणूकही करत असतात. एलआयसीनं अशीच पॉलिसी आणली आहे जी मुलीच्या विवाहासाठी तयार करण्यात आलीये. कन्यादान योजना असं या पॉलिसीचं नाव आहे. या प्लॅनमध्ये, दैनंदिन आधारावर, हा प्लॅन १२१ रुपये ते सुमारे ३६०० रुपयांच्या मासिक प्रीमियमवर मिळू शकतो. पण जर एखाद्याला यापेक्षा कमी प्रीमियम किंवा जास्त प्रीमियम भरायचा असेल तरी तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो. 

कन्यादान पॉलिसी ही एलआयसीच्या जीवन लक्ष्य पॉलिसीचं कस्टमाईज्ड व्हर्जन आहे. यामध्ये, जर तुम्ही २२ वर्षांसाठी प्रीमियम भरला तर २५ वर्षानंतर योजना मॅच्युअर होते आणि तुम्हाला २६ लाख रुपये मिळतील. म्हणजेच या योजनेत वेळेत गुंतवणूक सुरू केली, तर मुलीच्या भवितव्यासाठी तुम्ही मोठी रक्कम जमा करू शकता.  

मुलीच्याच नावे अकाऊंट 

या योजनेत अकाऊंट होल्डर मुलीचे पालक असतात. पॉलिसीची मुदत १३-२५ वर्षे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टर्म निवडू शकता. पॉलिसी घेण्यासाठी मुलीचं वय १ वर्ष ते १० वर्षे आणि वडिलांचं वय किमान १८ वर्षे आणि कमाल ५० वर्षे असावं. तसंच मॅच्युरिटीचं कमाल वय 65 वर्षे आहे. तुम्ही प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक देखील भरू शकता. 

प्रीमिअम कमी जास्त करू शकता 

या पॉलिसीसाठी तुम्हाला ३६०० रुपयांचा मासिक प्रीमियम भरावा लागेल असे नाही. तुम्ही दरमहा एवढी रक्कम गुंतवू शकत नसाल, तर तुम्ही यापेक्षा कमी प्रीमियम असलेली योजना देखील घेऊ शकता. त्याच वेळी, आपण इच्छित असल्यास, आपण यापेक्षा जास्त प्रीमियम योजना खरेदी करू शकता. तुमच्या प्रीमियमनुसार पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर हा लाभ मिळतो. 

मॅच्युरिटी बेनिफिट्स 

पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर, विम्याच्या रकमेसह, साध्या रिव्हिजनरी बोनसचा लाभ देखील उपलब्ध आहे. याशिवाय अतिरिक्त बोनसचाही लाभ मिळतो. याशिवाय पॉलिसी खरेदी केल्यानंतर तीन वर्षांनी तुम्ही त्यावर कर्जही घेऊ शकता. प्रीमियम जमा केल्यावर 80C अंतर्गत सूट उपलब्ध आहे आणि कलम 10D अंतर्गत मॅच्युरिटी रक्कम करमुक्त आहे. पॉलिसीसाठी विमा रकमेची मर्यादा किमान १ लाख रुपयांपासून सुरू होते आणि कमाल मर्यादा नाही.

टॅग्स :एलआयसीगुंतवणूकपैसा