Join us  

LIC Amritbaal: मुलांच्या उच्च शिक्षणाचे नो टेंशन! एलआयसीने नवीन अमृतबल पॉलिसी केली लाँच, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 2:55 PM

मुलांच्या उच्च शिक्षणासाठी ही पॉलिसी आणण्यात आली असून शिक्षणासाठीच्या भविष्यातील मुलांच्या गरजा लक्षात घेण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे आजपासूनच ग्राहक ही पॉलिसी खरेदी करू शकतात. 

सार्वजनिक क्षेत्रतील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) ने नवीन पॉलिसी लाँच केली आहे. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी ही पॉलिसी आणण्यात आली असून शिक्षणासाठीच्या भविष्यातील मुलांच्या गरजा लक्षात घेण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे आजपासूनच ग्राहक ही पॉलिसी खरेदी करू शकतात. 

एलआयसीने या पॉलिसीचे नाव अमृतबाळ (LIC Amritbaal) असे दिले आहे. ही एक चाईल्ड इन्शुरन्स पॉलिसी असून लाईफ इन्शुरन्सला नव्या स्वरुपात आणण्यात आले आहे. या पॉलिसीसाठी मुलाचे कमीतकमी वय हे जन्मापासून ३० दिवस ते १३ वर्षे ठेवण्यात आले आहे. 

या पॉलिसीचा मॅच्युरिटी पिरिएड हा १८ ते २५ वर्षे आहे. पॉलिसीसाठी ५,६ किंवा ७ वर्षांत प्रिमिअम देण्याची देखील सोय आहे. जास्तीत जास्त १० वर्षे तुम्हाला पैसे गुंतवावे लागणार आहेत. ही एका गॅरंटीड रिटर्न पॉलिसी असून १००० रुपयांवर ८० रुपयाच्या हिशेबाने रिटर्न मिळणार आहे. म्हणजे जर तुम्ही एक लाखाचा इन्शुरन्स केला तर वर्षाच्या शेवटी त्या रकमेत ८००० रुपये जोडले जाणार आहेत. हे पॉलिसी मॅच्युअर होईस्तोवर पैसे दिले जाणार आहेत. 

या प़ॉलिसीमध्ये कमीतकमी सम इंश्युअर्ड २ लाख रुपये आणि जास्तीतजास्त कोणतेच लिमिट नाहीय. मॅच्युरिटी डेटला ही रक्कम देणे एलआयसीला बाध्य असणार आहे. तसेच मुलाची जरी पॉलिसी असली तरी पालकाच्या मृत्यूनंतर मुलाला एक रकमी किंवा लिमिटेड प्रिमिअम पेमेंटनुसार समएश्युअर्ड निवडण्याचा पर्याय आहे. 

टॅग्स :एलआयसीशिक्षण