Join us

PPF मध्ये गुंतवणूक करणं योग्य आहे का, तुमचं आर्थिक ध्येय पूर्ण करू शकतं का? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 15:15 IST

PPF Investment: जर तुम्ही तुमचं आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पीपीएफ तुम्हाला कशी मदत करू शकते ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

PPF Investment: पीपीएफ हा गुंतवणुकीचा अतिशय सुरक्षित पर्याय आहे. हे विशेषतः अशा गुंतवणूकदारांसाठी आहे ज्यांना आपले पैसे सुरक्षित ठेवायचे आहेत आणि करात सूट देखील मिळवायची आहे. जर तुम्ही तुमचं आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पीपीएफ तुम्हाला कशी मदत करू शकते ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

पीपीएफमध्ये गुंतवणुकीचे फायदे काय?

सुरक्षित, खात्रीशीर परतावा

पीपीएफची हमी भारत सरकारकडून दिली जाते, ज्यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते. याशिवाय त्यात मिळणारा व्याजदर सरकारकडून निश्चित केला जातो.

टॅक्स बेनिफिट्स

पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास कलम ८० सी अंतर्गत तुम्हाला करसवलत मिळते. या योजनेत तुम्ही दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता आणि त्यावर मिळणारं व्याजही आयकरातून मुक्त आहे.

दीर्घ काळासाठी चांगला परतावा

पीपीएफची गुंतवणूक १५ वर्षांसाठी असते. यात सरासरी ७% ते ८% व्याजदर मिळतो.

पीपीएफ तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करू शकेल का?

पीपीएफची वैधता १५ वर्षांची असते. मुलांचं शिक्षण, निवृत्तीचं नियोजन किंवा घर खरेदी अशी काही आर्थिक उद्दिष्टे असतील तर पीपीएफ हा उत्तम पर्याय ठरू शकतो. आपण याकडे एक स्थिर आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहू शकता, जे आपल्याला कालांतरानं चांगला परतावा देऊ शकते. समजा तुम्ही पीपीएफमध्ये दरवर्षी दीड लाख रुपये गुंतवले आणि सरासरी ७.५ टक्के व्याज मिळाले, तर तुमची गुंतवणूक १५ वर्षांनंतर सुमारे ४४ लाख रुपये होऊ शकते.जर आपल्याकडे लहान आर्थिक उद्दिष्टे असतील, जसे की ट्रॅव्हल बजेट किंवा लग्नासाठी पैसे जमवणं, पीपीएफ हा एक चांगला पर्याय असू शकतो.

कर बचतीचं उद्दिष्ट

जर तुमचं मुख्य उद्दिष्ट कर वाचवणं असेल तर पीपीएफ हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरू शकतो. शिवाय इथे मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर लागत नाही, त्यामुळे तो अधिकच आकर्षक बनतो.

टॅग्स :पीपीएफगुंतवणूक