Join us

TATA समुहाची लोकप्रिय कंपनी IPO आणणार? मिळणार कमाईची मोठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 21:41 IST

लवकरच या कंपनीचा आयपीओ येण्याची शक्यता आहे.

TATA Play IPO : टाटा समूहाच्या सॅटेलाइट टीव्ही व्यवसायाशी निगडीत कंपनी ‘टाटा प्ले’चा आयपीओ येण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या अखेरीस कंपनी सेबीकडे ड्राफ्ट पेपर सादर करू शकते. दरम्यान, यावर्षी टाटा स्कायचे ब्रँड नाव बदलून टाटा प्ले लिमिटेड करण्यात आले आहे.

या आयपीओवर गेल्या वर्षीच काम सुरू करण्यात आले होते. परंतु ते काही काळासाठी स्थगित करण्यात आले. कंपनीचे री-ब्रँडिंग हे त्यामागील कारण होते. याशिवाय कॅलेंडर वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांतही बाजारात चढउतार होते. यामुळे आयपीओची थोडी प्रतीक्षा होती. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा (DRHP) मसुदा या महिन्याच्या अखेरीस SEBI कडे सादर केला जाईल अशी अपेक्षा असल्याचे मिंटनं सूत्रांच्या हवल्याने म्हटले आहे.

प्रस्तावित IPO मध्ये, गुंतवणूकदार टेमासेक आणि टाटा कॅपिटल त्यांच्या कंपनीतील हिस्स्यापैकी काही भाग विकतील. IPO चा आकार 300-400 मिलियन डॉलर्स इतका राहण्याची अपेक्षा आहे. टाटा सन्स आणि नेटवर्क डिजिटल डिस्ट्रिब्युशन सर्व्हिसेस FZ-LLC (NDDS) यांच्यातील 80:20 संयुक्त उपक्रम म्हणून टाटा स्कायने 2004 मध्ये कामकाज सुरू केले. NDDS हे रूपर्ट मर्डोक यांच्या 21st सेंचुरी फॉक्सच्या मालकीची कंपनी आहे.

डिस्नेने 2019 मध्ये फॉक्सचे अधिग्रहण केले. टीएस इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडच्या माध्यमातून डिस्नेची टाटा स्कायमध्ये आणखी 9.8 टक्के भागीदारी आहे. टाटा सन्सचा कंपनीत 41.49 टक्के हिस्सा आहे. 33.23 टक्के मार्केट शेअरनुसार टाटा प्ले ही सर्वात मोठी डीटीएच सेवा पुरवणारी कंपनी आहे.

टॅग्स :टाटाइनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक