Join us

२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 12:13 IST

Union Bank of India Savings Scheme : तुम्ही युनियन बँक ऑफ इंडियामध्ये किमान ७ दिवस आणि जास्तीत जास्त १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खाते उघडू शकता.

Union Bank of India Savings Scheme : रिझर्व्ह बँकेने या वर्षात रेपो दरात कपात केल्यानंतर, अनेक बँकांनी आपल्या एफडीवरील व्याजदर कमी केले आहेत. मात्र, तरीही सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडिया आकर्षक व्याजदर देत आहे. बँकेच्या विविध कालावधीच्या एफडी योजनांवर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. यामध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत आकर्षक व्याजदर दिले जात आहेत.

युनियन बँकेच्या एफडीवर आकर्षक व्याजदरयुनियन बँक ऑफ इंडिया ७ दिवसांपासून १० वर्षांपर्यंतच्या एफडी योजनांवर सामान्य नागरिकांना ३.४०% ते ७.३५% पर्यंत व्याज देत आहे. विशेषतः, बँकेच्या काही विशिष्ट एफडी योजना सामान्य नागरिकांसाठी ६.६०%, ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.१०% आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.३५% व्याज देत आहेत.

२ वर्षांच्या एफडीवर मोठा परतावायुनियन बँक ऑफ इंडिया सध्या २ वर्षांच्या एफडीवर चांगला परतावा देत आहे.

  1. सामान्य नागरिक: ६.५०% व्याज.
  2. ज्येष्ठ नागरिक: ७.००% व्याज.
  3. अति ज्येष्ठ नागरिक: ७.२५% व्याज.

२ लाख रुपयांवर किती फायदा?

  • जर तुम्ही युनियन बँकेच्या २ वर्षांच्या एफडीमध्ये २ लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला मिळणारा परतावा खालीलप्रमाणे असेल. 
  • सामान्य नागरिकांना २७,५२८ रुपये व्याज मिळेल. म्हणजे मुदतपूर्तीनंतर एकूण २,२७,५२८ रुपये परत मिळतील.
  • ज्येष्ठ नागरिकांना २९,७७६ रुपये निव्वळ व्याज मिळेल. आणि मुदतपूर्तीनंतर एकूण २,२९,७७६ रुपये परत मिळतील.
  • अति ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक ३०,९०८ रुपये व्याज मिळेल. म्हणजे मुदतपूर्तीनंतर एकूण २,३०,९०८ रुपये परत मिळतील.

तुमच्यासाठी हा एक सुरक्षित आणि चांगला परतावा मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे, विशेषतः जेव्हा इतर अनेक बँकांनी व्याजदर कमी केले आहेत.

वाचा - भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या

टीप : हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने लिहिला आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा कोणताही आर्थिक धोका पत्करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.

टॅग्स :गुंतवणूकभारतीय रिझर्व्ह बँकबँकबँकिंग क्षेत्र