Value of Money : अलीकडच्या काळात लोक आर्थिक नियोजनाबाबत चांगले जागरुक झाले आहेत. स्वतःचे घर असो, मुलांचे शिक्षण असो वा मुलीचे लग्न. यासाठी नोकरीला लागल्यापासूनच पैसे जमा करायला सुरुवात करतात. मात्र, हे सर्व करताना भविष्यात आपल्या पैशांचे मूल्य किती कमी होईल? याकडे अनेजण दुर्लक्ष करतात. वेळेनुसार रुपयाचे मूल्य कमी होत जाते. त्यामुळे आज तुम्हाला १ कोटी ही मोठी रक्कम वाटत असली तरी, १० वर्षांनंतर तिचे मूल्य तेवढे राहणार नाही. चढत्या महागाईमुळे जर योग्य ठिकाणी गुंतवणूक केली नाही, तर तुमची बचत अपेक्षेपेक्षा खूपच कमी ठरू शकते.
१० वर्षांनंतर १ कोटी रुपयाची किंमत किती असेल?महागाईमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती दरवर्षी वाढत जातात. यामुळे तेवढ्याच पैशांमध्ये कमी वस्तू मिळतात. भारतात गेल्या अनेक वर्षांपासून सरासरी महागाई दर ५% ते ७% च्या दरम्यान राहिला आहे. जर आपण महागाईचा दर सरासरी ६% गृहीत धरला, तर इन्फ्लेशन कॅल्क्युलेटरनुसार आजच्या १ कोटीची भविष्यातील किंमत १० वर्षांनंतर सुमारे १.७९ कोटी रुपये होईल. सोप्या भाषेत याचा अर्थ असा की, आज तुम्ही १ कोटीमध्ये जी वस्तू खरेदी करू शकता, तीच वस्तू २०२५ पासून १० वर्षांनी, म्हणजेच २०३५ मध्ये, खरेदी करण्यासाठी तुम्हाला १.७९ कोटी रुपये खर्च करावे लागतील.
आजच्या १ कोटीची १० वर्षांनंतरची 'खरी किंमत'महागाईमुळे रुपयाची खरेदी करण्याची ताकद कमी होते. ६% महागाई दरानुसार, आजच्या १ कोटी रुपयाची १० वर्षांनंतरची खरी किंमत सुमारे ५६ लाख रुपये राहील.
महागाईचा परिणाम का होतो?महागाई दराचा अर्थ रोजच्या गरजेच्या वस्तू आणि सेवांच्या दरात होणारी वाढ आहे. जेव्हा वस्तूंचे दर वाढतात, तेव्हा रुपयाची खरेदी करण्याची क्षमता कमी होते. अनेक लोक बँकेतील बचत खात्यात किंवा एफडीमध्ये पैसे ठेवतात. परंतु, यातून मिळणारे व्याज महागाईचा दर पूर्णपणे भरून काढू शकत नाही. त्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित असले तरी त्यांचे वास्तविक मूल्य कमी होत जाते.
गुंतवणुकीतून महागाईला हरवण्याची तयारी
- महागाई नेहमीच अर्थव्यवस्थेचा एक भाग राहील. त्यामुळे, व्यक्तीने योग्य आर्थिक नियोजन करून महागाईवर मात करण्याची तयारी करावी.
- स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड्समध्येगुंतवणूक केल्यास, दीर्घकाळात महागाईच्या दरापेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते.
- जोखिम आणि परतावा
- म्युच्युअल फंड्स : सरासरी १२% परतावा मिळून १ कोटीच्या गुंतवणुकीचे १५ वर्षांत ५.४७ कोटी होऊ शकतात (जोखीम जास्त).
- एफडी : सरासरी ६.५% परतावा मिळून १ कोटीच्या गुंतवणुकीचे १५ वर्षांत २.६३ कोटी होऊ शकतात (जोखीम कमी).
- बचत खाते : सरासरी ३% परतावा मिळून १ कोटीच्या गुंतवणुकीचे १५ वर्षांत १.५६ कोटी होऊ शकतात (जोखीम अत्यंत कमी).
वाचा - ६ वर्षांतील सर्वात मोठे मतभेद! फेडरल रिझर्व्हमध्येच धोरणांवर एकमत नाही; व्याजदरात कपात केली पण...
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Inflation erodes savings' value. ₹1 crore today equals ₹56 lakh in 10 years due to rising costs. Beat inflation with stocks/mutual funds for higher returns than FDs or savings accounts. Plan wisely.
Web Summary : महंगाई बचत का मूल्य कम करती है। आज का ₹1 करोड़ 10 वर्षों में ₹56 लाख के बराबर होगा। एफडी या बचत खातों से बेहतर रिटर्न के लिए स्टॉक/म्यूचुअल फंड में निवेश करें। योजना समझदारी से बनाएं।