Join us
Daily Top 2Weekly Top 5

Inflation Impact in India: २० वर्षांनंतर किती असेल १ लाख रुपयांचं मूल्य, समजून घ्या महागाईचं संपूर्ण गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 14:30 IST

Impact of inflation in India: आजच्या काळात शहरात राहणाऱ्या कुटुंबांसाठी लाखभर रुपये खर्च करणं ही सामान्य बाब झाली आहे. मात्र, ज्या वेगाने महागाई वाढत आहे, ते पाहता भविष्यात या १ लाख रुपयांचे मूल्य किती असेल, असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे.

Impact of inflation in India: आजच्या काळात शहरात राहणाऱ्या कुटुंबांसाठी लाखभर रुपये खर्च करणं ही सामान्य बाब झाली आहे. मात्र, ज्या वेगाने महागाई वाढत आहे, ते पाहता भविष्यात या १ लाख रुपयांचे मूल्य किती असेल, असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. आजपासून २० वर्षांनंतर १ लाख रुपयांत उदरनिर्वाह करणं शक्य होईल का, हे सविस्तर जाणून घेऊया.

महागाई आणि चक्रवाढ व्याजाचं गणित

वित्तीय सल्लागारांच्या मते, महागाई अत्यंत शांतपणे तुमच्या खिशावर दरोडा टाकत असते. चक्रवाढ व्याजाच्या सूत्रानं गणना केल्यास, जर महागाईचा सरासरी दर वार्षिक ६% राहिला, तर २० वर्षांनंतर १ लाख रुपयांचे मूल्य प्रचंड घटलेलं असेल. त्या काळात आजच्यासारखी जीवनशैली जगण्यासाठी तुम्हाला दरमहा सुमारे ३.२० लाख रुपयांची गरज भासेल.

२५,०००,००० रुपयांची सॅलरी! बर्कशायर हॅथवेच्या CEO च्या कमाईनं वॉरेन बफे यांनाच टाकलं मागे

महागाईच्या दरानुसार २० वर्षांनंतरचा अपेक्षित खर्च:

  • ६% महागाई दर - २० वर्षांनंतरचा खर्च = ₹३,२०,७१४
  • ५% महागाई दर - २० वर्षांनंतरचा खर्च = ₹२,६५,०००
  • ४% महागाई दर - २० वर्षांनंतरचा खर्च = ₹२,१९,००० 

यावरून स्पष्ट होतं की, महागाई जेवढी जास्त असेल, तेवढ्या अधिक पैशांची गरज लागेल. भारतात दीर्घकाळापासून महागाईचा सरासरी दर ५-७% दरम्यान राहिला आहे. जरी RBI ने हा दर ४% वर ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवलं असलं, तरी प्रत्यक्षात भाज्या, दूध आणि घरांच्या किमती काळाप्रमाणं दुप्पट-तिप्पट होत असतात.

भविष्यातील नियोजन आवश्यक

अशा परिस्थितीत, आज तुम्हाला जो फ्लॅट ५० लाख रुपयांना मिळत आहे, त्याची किंमत २० वर्षांनंतर १.६ कोटी रुपये होऊ शकते. त्यामुळे वाढती महागाई लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या निवृत्तीचं नियोजन करणं आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, २०१०-२०२० या दशकात महागाईचा दर सरासरी ६ टक्क्यांच्या वर होता आणि अलीकडील अहवालही दीर्घकाळासाठी हाच अंदाज वर्तवत आहेत.

बचत आणि गुंतवणुकीचे उपाय

  • बचतीचे प्रमाण: दरमहा आपल्या उत्पन्नातील किमान २०-३०% रक्कम बचतीसाठी बाजूला ठेवा.
  • इमर्जन्सी फंड: ६-१२ महिन्यांच्या खर्चा इतकी रक्कम वेगळी ठेवा, जेणेकरून अचानक गरज पडल्यास ती कामाला येईल.
  • SIP चा पर्याय: SIP च्या माध्यमातून केलेली छोटी गुंतवणूक दीर्घकाळात एक मोठा निधी तयार करू शकते.
English
हिंदी सारांश
Web Title : India Inflation Impact: Understanding the Future Value of ₹1 Lakh

Web Summary : Inflation erodes purchasing power. At 6% annual inflation, ₹1 lakh today will require ₹3.2 lakhs in 20 years to maintain the same lifestyle. Plan for future expenses by saving 20-30% of income and investing wisely.
टॅग्स :महागाई