Join us

आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू २५ एप्रिलला लाँच; १३.०१ टक्के प्रभावी परताव्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 08:27 IST

२५ एप्रिल २०२५ रोजी आयसीएल फिनकॉर्प सिक्युअर्ड रिडीमेबल नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्सचा (एनसीडी) नवा सार्वजनिक इश्यू लाँच झाला आहे. हा इश्यू १३.०१% पर्यंतचा प्रभावी परतावा (Effective Yield) देऊ शकेल, असा दावा करण्यात आला आहे.

२५ एप्रिल २०२५ रोजी आयसीएल फिनकॉर्प सिक्युअर्ड रिडीमेबल नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्सचा (एनसीडी) नवा सार्वजनिक इश्यू लाँच झाला आहे. या नव्या इश्यूचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचं कंपनीनं म्हटलं. १३.०१% पर्यंतचा प्रभावी परतावा (Effective Yield) देऊ शकणारा हा इश्यू, सोयीस्कर आणि लवचिक मुदतीची गुंतवणूक शोधणाऱ्यांसाठी आकर्षक आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो.

आमच्या यापूर्वीच्या एनसीडी इश्यूजना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता, तसंच तो ओव्हर सबस्क्राईब झाला होता. गुंतवणूकदारांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळं आम्हाला सन्मानित झाल्याप्रमाणं वाटत आहे. सातत्यानं मिळणारं पाठबळ आम्हाला आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार अधिक मजबूत आर्थिक उपाय प्रदान करण्यास प्रेरित करतं.

एनसीडी इश्यू ९ मे २०२५ पर्यंत खुला राहील. याला क्रिसिल बीबीबी / स्टेबल रेटिंग देण्यात आलंय. प्रत्येक एनसीडीची फेस व्हॅल्यू १,००० रुपये आहे आणि इश्यू दहा पर्यायांमध्ये (१० आयएसआयएन) चार योजना ऑफर करतो. याचे व्याजदर ११.००% ते १२.२५% पर्यंत आहेत. तसंच अर्ज करण्यासाठी किमान १०,००० रुपयांची आवश्यकता आहे.

या इश्यूमधून मिळणारं उत्पन्न आयसीएल फिनकॉर्पच्या वाढीच्या उपक्रमांसाठी आणि भारतातील आमच्या ग्राहकांना आणि भागधारकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची गुणवत्ता आणखी वाढवण्यासाठी धोरणात्मकरित्या वापरलं जाईल. हे पाऊल विश्वासार्ह, नाविन्यपूर्ण आणि ग्राहक-केंद्रित आर्थिक उपाय प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला दर्शवतं.

आयसीएल फिनकॉर्प गेल्या ३४ वर्षांपासून अविरत कार्यरत आहे. आयसीएल फिनकॉर्पचे सीएमडी अ‍ॅड. के.जी. अनिल कुमार यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली एक विश्वासार्ह आर्थिक भागीदार म्हणून ते काम करतंय. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओरिसा, महाराष्ट्र आणि गुजरात या ८ राज्यांमध्ये कंपनी कार्यरत आहे. आम्ही संपूर्ण भारतात आपला ठसा उमटवण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहोत. तामिळनाडूमध्ये ९३ वर्षांचा इतिहास असलेल्या आणि बीएसईवर लिस्टेड असलेल्या सेलम इरोड इन्व्हेस्टमेंट्स या एनबीएफसीच्या अधिग्रहणामुळे वित्तीय क्षेत्रातील आमचं स्थान आणखी मजबूत झालं आहे.

आयसीएल फिनकॉर्प गोल्ड लोन, हायर पर्चेज लोन आणि बिझनेस लोनसह सेवांचा एक व्यापक पोर्टफोलिओ प्रदान करते. आयसीएल समूहानं ट्रॅव्हल, फॅशन, डायग्नोस्टिक आणि चॅरिटेबल इनिशिएटिव्ह्स सारख्या क्षेत्रांमध्ये ही विविधता आणली आहे. अनिल कुमार आणि उमा अनिल कुमार यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली, आयसीएल फिनकॉर्पचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ग्राहकांचा शाश्वत विश्वास संपादन करत असून रिझर्व्ह बँकेच्या मानकांचं पालन करत आहे.

या नवीन एनसीडी इश्यूचं अनावरण करताना, आम्ही तुम्हाला आर्थिक वाढ, सुरक्षितता आणि दीर्घकालीन मूल्याच्या दिशेनं आमच्या प्रवासात सहभागी होण्याचं आवाहन करत आहोत.

अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

Website URL - ICL Fincorp Ltd :- https://iclfincorp.com

Instagram Page - https://www.threads.net/@iclfincorp?xmt=AQGzT38eWLnenRpx824HnzHs5gr4sePzw5YVGmSUFLViLqU

Facebook - https://www.facebook.com/iclfincorp/

YouTube - https://youtube.com/@iclfincorp?si=q02Q1I2tjqLboIqR

(Disclaimer - हा स्पॉन्सर्ड लेख असून त्यातील माहिती, मते आणि अंदाज याचा 'लोकमत'शी कुठलाही संबंध नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)