Happy retirement : निवृत्तीनंतर नातवंडासोबत आनंदी आयुष्य जगायचं असेल तर निवृत्ती नियोजन (Retirement planning) करणे आवश्यक आहे. वाढती महागाई आणि गरजा लक्षात घेऊन सुखी आणि सुरक्षित भविष्यासाठी योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध बचत खूप महत्त्वाची आहे. पूर्वीच्या काळी पेन्शन आर्थिक सुरक्षा पुरवत होती. पण, आता वाढत्या गरजा पाहता पेन्शन अपुरी ठरत आहे. दुसरीकडे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळत नाही. अशा परिस्थितीत आर्थिक नियोजन करणे काळाजी गरज बनली आहे. तुम्ही तुमच्या निवृत्तीचे नियोजन करण्यासाठी ५ टीप्स वापरू शकता.
निवृत्तीचं ध्येय ठरवानिवृत्तीचे आर्थिक नियोजन करण्याची पहिली पायरी म्हणजे तुमची आर्थिक उद्दिष्टे ठरवणे. सर्वप्रथम, तुम्हाला कोणत्या वयात निवृत्त व्हायचे आहे ते ठरवा. तुम्ही जितक्या लवकर निवृत्त व्हाल तितका मोठा निधी तुम्हाला लागेल. तसेच, निवृत्तीनंतर तुमचे राहणीमान कसे असेल याचा विचार करा. तुमच्या खर्चात भविष्यात वाढ होईल की कपात? याचा विचार करा. याव्यतिरिक्त, निवृत्तीनंतरचे संभाव्य मोठे खर्च लक्षात ठेवा, जसे की आरोग्य खर्च, प्रवासाचे नियोजन आणि कुटुंबातील इतर सदस्यांना आधार देण्यासाठी आर्थिक सहाय्य. महागाई लक्षात घेऊन तुम्हाला किती पैसे लागतील याचा अंदाज घ्या.
शुभस्य शीघ्रम..याचा अर्थ कुठल्याही गोष्टीची लवकर सुरुवात करणे कधीही चांगले. निवृत्तीचे नियोजन करतानाही हा नियम पाळायला हवा. गुंतवणूक लवकर सुरू करणे सर्वात फायदेशीर आहे. चक्रवाढीच्या परिणामामुळे तुमचे भांडवल अनेक पटींनी वाढू शकते. उदाहरणार्थ, जर तुम्ही १२% वार्षिक परतावा असलेल्या फंडात दरमहा १०,००० रुपये गुंतवले तर ३० वर्षांत ही रक्कम ३.५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. परंतु, जर तुम्ही १० वर्षांनी उशीराने सुरुवात केली तर ते फक्त १ कोटी रुपयांपर्यंत मर्यादित असेल. म्हणूनच, जर तुम्ही तरुण असाल, तर इक्विटी म्युच्युअल फंडासारख्या उच्च-वाढीच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे चांगले होईल.
उत्पन्नाप्रमाणे गुंतवणूकही वाढवाजसे आपले उत्पन्न वाढते त्याच प्रमाणात तुमची सेवानिवृत्ती बचतही वाढली पाहिजे. दर २-३ वर्षांनी तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओचा आढावा घ्या आणि आवश्यकतेनुसार बदल करा. जसजसे तुम्ही निवृत्तीच्या जवळ जाता, तसतसे मुदत ठेवी, रोखे आणि एन्युटी यांसारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे जा.
जोखीम आणि वैद्यकीय खर्चाचे व्यवस्थापनसेवानिवृत्ती नियोजनातील सर्वात मोठा धोका म्हणजे अनपेक्षित आरोग्य खर्च. त्यामुळे म्हातारपणी आर्थिक भार पडू नये म्हणून आधीच चांगला आरोग्य विमा घ्या. यासोबतच ६-१२ महिन्यांच्या खर्चाइतका इमर्जन्सी फंड तयार करणेही महत्त्वाचे आहे.
वाचा - 'ही' कागपत्रे असतील तर कोणतीही बँक गृहकर्ज नाकारणार नाही; संपूर्ण यादी वाचा
कर नियोजनकर वाचवण्यासाठी योग्य धोरण वापरा. EPF, PPF आणि NPS सारख्या योजना कलम ८०C अंतर्गत कर लाभ देतात. NPS मध्ये ५०,००० रुपयांच्या अतिरिक्त कपातीचा लाभ देखील उपलब्ध आहे. निवृत्तीनंतर कर दायित्व कमी करण्यासाठी योग्य पैसे काढण्याची योजना बनवा. काही गुंतवणूक (PPF, EPF) करमुक्त आहेत, तर काही (FD, Annuity) करपात्र आहेत.