Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver १९२५ रुपयानी महागलं; Gold झालं स्वस्त, पटापट चेक करा नवे दर

By जयदीप दाभोळकर | Updated: November 24, 2025 15:22 IST

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या काळात सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय बदल दिसून येत आहेत. पाहा काय आहेत लेटेस्ट दर.

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या काळात सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय बदल दिसून येत आहेत. आज, सोमवार, २४ नोव्हेंबर रोजी, सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव फक्त ८९ रुपयांनी कमी होऊन १२५७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. आता जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा भाव प्रति १० ग्रॅम १२६७४७ रुपये आहे. तर, चांदी जीएसटीसह १५७६४५ रुपये प्रति किलो झालीये. आज जीएसटीशिवाय ती १९२५ रुपयांनी वाढली आणि १५३०५४ रुपये प्रति किलोवर उघडली. शुक्रवारी, जीएसटीशिवाय चांदी १५११२९ रुपये प्रति किलोवर बंद झाली आणि जीएसटीशिवाय सोनं १२३१४६ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झालं.

१७ ऑक्टोबर रोजी सोन्याची किंमत १,३०,८७४ या उच्चांकी स्तरावरुन ७,८१७ रुपयांनी घसरली आहेत. १४ ऑक्टोबर रोजीच्या १,७८,१०० या सर्वोच्च ₹वरून चांदीची किंमत २५,०४६ रुपयांनी घसरली आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते: एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसरे संध्याकाळी ५ वाजता हे दर जाहीर केले जातात.

या कारणामुळे 'स्टील किंग' लक्ष्मी मित्तल यांनी ब्रिटन सोडलं, आता कुठे स्थायिक होणार, जाणून घ्या

कॅरेटनुसार सोन्याचे दर

आज, २३ कॅरेट सोनं देखील ८९ रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम १२२,५६४ रुपयांवर उघडलं. GST सह त्याची किंमत आता ₹१२६,२४० आहे. यात मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.

२२ कॅरेट सोन्याची किंमत ₹८२ ने घसरून प्रति १० ग्रॅम ११२,७२० रुपयांवर आली आहे. GST सह, ती ११६,१०१ रुपयांवर आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव ६७ रुपयांनी घसरून ९२३६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे आणि जीएसटीमुळे त्याची किंमत ९५०६१ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचली आहे.

१४ कॅरेट सोन्याचा दर ७१,९८८ रुपयांवर उघडला आणि जीएसटीसह तो ७४,१४७ रुपयांवर आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold prices fall, silver soars: Check latest rates now!

Web Summary : Gold prices dipped slightly, while silver surged significantly by ₹1925 per kg. Check the updated rates for 24, 23, 22, 18, and 14-carat gold.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक