Join us

ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?

By जयदीप दाभोळकर | Updated: October 20, 2025 13:39 IST

Gold Silver Price on Diwali: धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी न करू शकलेल्या लोकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले होते, ते आता खाली आले आहेत.

Gold Silver Price on Diwali: धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी न करू शकलेल्या लोकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले होते, ते आता खाली आले आहेत. आज दिवाळीच्या दिवशी चांदी एका झटक्यात ९१३० रुपये स्वस्त झाली आहे, तर सोन्याच्या दरात २८५४ रुपयांची घसरण झाली. २४ कॅरेट सोन्याचा भाव आता जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,३०,५३१ रुपये झाला आहे. तर, चांदी जीएसटीसह प्रति किलो १,६४,९०३ रुपयांवर आली आहे.

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात सोनं प्रति १० ग्रॅम ११३८१ रुपये महाग झालं. तर, चांदीच्या किमतीत प्रति किलो १७,६६६ रुपयांची वाढ झाली.

उद्या शेअर बाजारात कामकाज सुरू राहणार का? स्टॉक मार्केटला कधी-कधी आहेत सुट्ट्या, पाहा यादी

IBJA नुसार, शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीशिवाय १,२९,५८४ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. दुसरीकडे, चांदी देखील जीएसटीशिवाय प्रति किलो १,६९,२३० रुपयांवर बंद झाली होती. आज सोनं जीएसटीशिवाय प्रति १० ग्रॅम १,२६,७३० रुपये दरानं उघडले आणि चांदी १,६०,१०० रुपयांवर उघडली. आयबीजेए दिवसातून दोन वेळा दर जारी करते. एकदा दुपारी १२ वाजताच्या सुमारास आणि दुसऱ्यांदा ५ वाजताच्या आसपास दर जारी केले जातात.

कॅरेटनुसार सोन्याचे दर

  • आज २३ कॅरेट सोनं देखील २८४२ रुपये स्वस्त होऊन प्रति १० ग्रॅम १२६२२३ रुपयांच्या भावानं उघडलं. जीएसटीसह त्याची किंमत आता १३०००९ रुपये झाली आहे. यामध्ये सध्या मेकिंग चार्जेस जोडलेले नाहीत.
  • २२ कॅरेट सोन्याची किंमत २४१४ रुपयांनी कमी होऊन प्रति १० ग्रॅम ११६०८५ रुपयांवर पोहोचलेत. जीएसटीसह ते ११९५६७ रुपये झाले आहेत.
  • १८ कॅरेट सोनं २१४० रुपयांच्या घसरणीसह प्रति १० ग्रॅम ९५०४८ रुपयांवर पोहोचलंय आणि जीएसटीसह त्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९७,८९९ रुपयांवर पोहोचली आहे.
  • १४ कॅरेट सोनं देखील १६७० रुपये स्वस्त होऊन ७४१३७ रुपयांवर उघडलं आणि आता जीएसटीसह ७६३६१ रुपयांवर आलंय.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold and silver prices plummet on Diwali; massive price drops!

Web Summary : Good news for buyers! Gold and silver prices crashed on Diwali. Silver fell by ₹9,130 per kg, while gold decreased by ₹2,854 per 10 grams. 24 Carat gold is now ₹1,30,531 per 10 grams with GST.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक