Join us

Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

By जयदीप दाभोळकर | Updated: July 8, 2025 14:56 IST

Gold Silver Price 8 July: आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी तेजी दिसून येत आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत आजचे नवे दर.

Gold Silver Price 8 July: आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी तेजी दिसून येत आहे. आज सोन्याच्या किमतीत ५९९ रुपयांची आणि चांदीच्या किमतीत ११५९ रुपयांची वाढ झाली आहे. आज, मंगळवार ८ जुलै रोजी २४ कॅरेट सोनं ९७१९५ रुपयांवर उघडलं. जीएसटीसह, २४ कॅरेट सोनं १००११० रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकलं जात आहे, तर चांदी ११०,९२० रुपये प्रति किलोनं विकली जात आहे.

आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोनं देखील ५९७ रुपयांनी महागलं आणि ते ९६८०६ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडलं. जीएसटीसह, त्याची किंमत आता ९९७१० रुपये झाली आहे. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याची सरासरी स्पॉट किंमत ५०० रुपयांनी वाढून ८८९८२ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडली. जीएसटीसह, त्याची किंमत ९१६५१ रुपये प्रति १० ग्रॅम होईल.

मस्क यांच्या पक्षात भारतीय वंशाच्या वैभव यांच्याकडे मोठी जबाबदारी; कमाई पाहून अवाक् व्हाल

१८ कॅरेट सोन्याची किंमती किती?

१८ कॅरेट सोन्याची किंमतही ४१० रुपयांनी वाढून ७२८५७ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. ३% जीएसटी लावल्यानं त्याची किंमत ७५०४२ रुपये होईल. तर १४ कॅरेट सोन्याची किंमत ३१९ रुपयांनी वाढून ५६८२८ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. त्यात जीएसटी जोडल्यानंतर ते ५८५३२ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचेल. यामध्ये मेकिंग चार्जेसचा समावेश करण्यात आलेला नाही.

सोने आणि चांदीचे स्पॉट रेट इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारे (IBJA) जाहीर केले जातात. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.

टॅग्स :सोनंचांदी