Gold Silver Price 5 August 2025: ट्रम्प यांच्या धमक्यांमुळे आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या आहेत. आज सोन्याच्या किमतीत थोडीशी वाढ झाली असली तरी, तुम्हाला आता खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणारे. आज २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम २१० रुपयांची वाढ झाली आहे आणि ती १००३९७ रुपयांवर पोहोचली आहे. त्याच वेळी, चांदीच्या किमतीत प्रति किलो ५२८ रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर चांदी आता ११२४२८ रुपये प्रति किलो दरानं विकली जात आहे.
सोने आणि चांदीचे स्पॉट रेट इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) द्वारे जाहीर केले जातात. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.
जीएसटीसह सराफा बाजारात २४ कॅरेट सोनं १०३४०८ रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकलं जात आहे, तर चांदी ११५८०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. सोमवारी, जीएसटीशिवाय चांदी १११९०० रुपये प्रति किलोवर बंद झाली. तर, सोनं १००१६७ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं. सोनं आता १००५३३ रुपयांच्या आजवरच्या उच्चांकावरून फक्त १३६ रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर, चांदी ३४२२ रुपयांनी प्रति किलोनं घसरली आहे. २३ जुलै २०२५ रोजी चांदीनं ११५८५० रुपये प्रति किलोचा आजवरचा उच्चांक गाठला होता.
१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर काय?
आज २३ कॅरेट सोनेही २२९ रुपयांनी महागलं आणि ते ९९९९५ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह त्याची किंमत आता १०२९९४ रुपये आहे. त्यात मेकिंग चार्ज समाविष्ट नाही करण्यात आलेला नाही. २२ कॅरेट सोन्याची किंमत २११ रुपयांनी वाढून ९१९९४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. जीएसटीसह ती ९४७२२ रुपये झाली. आज १८ कॅरेट सोन्याची किंमत १७३ रुपयांनी वाढून ७५२९८ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडली आणि जीएसटीसह ती ७७५५६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. दुसरीकडे, १४ कॅरेट सोनं आता जीएसटीसह ६०४९३ रुपयांवर पोहोचले आहे.