Join us

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर

By जयदीप दाभोळकर | Updated: July 31, 2025 14:33 IST

Gold Silver Price 31 July: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर.

Gold Silver Price 31 July: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ६०३ रुपयांनी घसरून ९८४१४ रुपयांवर पोहोचला. त्याच वेळी, चांदीचा भाव प्रति किलो १६५५ रुपयांनी घसरला आहे. चांदी आता १११७४५ रुपये प्रति किलोने विकली जात आहे. जीएसटीसह सराफा बाजारात २४ कॅरेट सोनं १० ग्रॅमसाठी १०१३६६ रुपये दरानं विकलं जात आहे, तर चांदी ११५०९७ रुपये प्रति किलोनं विकली जात आहे. बुधवारी, जीएसटीशिवाय चांदीचा दर प्रति किलो ११३४०० रुपयांवर बंद झाला. तर, सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९९०१७ रुपयांवर बंद झाला.

सोन्याचा भाव १००५३३ रुपयांच्या त्याच्या आजवरच्या उच्चांकावरून ९८४१४ रुपयांवर घसरला आहे. या काळात सोनं २११९ रुपयांनी स्वस्त झालं. तर चांदी प्रति किलो ४१०५ रुपयांनी स्वस्त झाली आहे. २३ जुलै २०२५ रोजी चांदीनं प्रति किलो ११५८५० रुपयांचा उच्चांक गाठला होता.

ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका

२३ कॅरेट सोन्याचा भाव

आज २३ कॅरेट सोनंही ६०० रुपयांनी स्वस्त झाले आणि ते ९८०२० रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीमुळे त्याची किंमत आता १००९६० रुपये झाली आहे. यामध्ये मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. २२ कॅरेट सोन्याची किंमत ५५३ रुपयांनी घसरून ९०१४७ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. जीएसटीसह ते ९२८५१ रुपयांवर पोहोचलंय. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ४५२ रुपयांनी घसरून ७३८११ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आणि जीएसटीसह तो ७६०२५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तर १४ कॅरेट सोनं आता जीएसटीसह ५९३१९ रुपयांवर आलंय.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ने सोने आणि चांदीच्या स्पॉट किमती जाहीर केल्या आहेत. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असण्याची शक्यता आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसरी संध्याकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जातात.

टॅग्स :सोनंचांदी