Gold Silver Price 29 April: उद्या म्हणजेच ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे आणि एक दिवस आधी सोन्याच्या किंमतीत मोठा बदल झालाय. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ११७८ रुपयांनी वाढून ९६,२८६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर, चांदी ५५ रुपयांनी वधारून ९६,४८१ रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. जीएसटीमुळे सोन्याचा भाव आता ९९,१७४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर चांदीचा भाव ९९,३७५ रुपये प्रति किलोवर पोहोचला.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत, ज्यात जीएसटीच समावेश केला जात नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात.
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
अक्षय्य तृतीयेला लोक सोनं खरेदी करणं शुभ मानतात. त्यामुळे दरवर्षी अक्षय्य तृतीयेसाठी दुकानदारांना अनेक दिवस अगोदर ऑर्डर मिळत असत, मात्र यंदा ऑर्डर मिळत नाहीत. सोन्याच्या वाढलेल्या किमतींमुळे लोक सोने खरेदीत रस दाखवताना दिसत नाहीयेत.
काय आहे नवा दर?
आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ११७३ रुपयांनी वाढून ९५,९०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव १०७९ रुपयांनी वाढून ८८,१९८ रुपये झाला आहे. १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ८८४ रुपयांनी वाढ झाली असून ७२,२१५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलाय. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ६८९ रुपयांनी वाढून ५६,३२७ रुपये झालाय.