Join us

Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

By जयदीप दाभोळकर | Updated: July 3, 2025 14:42 IST

Gold Silver Price 3 July:  सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर.

Gold Silver Price 3 July:  सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज सोन्याच्या दरात ३०६ रुपयांनी तर चांदीच्या दरात १०६० रुपयांनी वाढ झाली. आज, ३ जुलै, गुरुवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ९७,७८६ रुपये झालाय. जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव १,००,७१९ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव १,१०,९८० रुपये प्रति किलो आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दर

आयबीजेएच्या दरानुसार २३ कॅरेट सोन्याचा भाव ३०६ रुपयांनी वाढून ९७,३९४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जीएसटीमुळे त्याची किंमत आता १,००,३१५ रुपये झाली आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव २८० रुपयांनी वाढून ८९,५७२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. जीएसटीमुळे तो ९२,२५९ रुपये प्रति १० ग्रॅम होईल.

चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स

१८ कॅरेट सोन्याचा भाव २३० रुपयांनी वाढून ७३,३४० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. ३ टक्के जीएसटीमुळे आता ७५,५४० रुपये मोजावे लागतील. आज १४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १७९ रुपयांनी वाढून ५७,२०५ रुपये झाला. त्यात जीएसटी जोडल्यानंतर तो ५८,९२१ रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (आयबीजेए) सोन्या-चांदीचे स्पॉट दर जाहीर केलेत. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात.

टॅग्स :सोनंचांदी