Join us

Gold Price : लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात घसरण; ४ दिवसांत चांदीही ७८७७ रुपयांनी स्वस्त, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

By जयदीप दाभोळकर | Updated: April 4, 2025 14:41 IST

Gold Silver Price 4 April: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात अजूनही घसरण दिसून येत आहे. पाहा काय आहेत आजचे नवे दर.

Gold Silver Price 4 April: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात अजूनही घसरण दिसून येत आहे. सोन्याचा भाव आज ९१,११५ रुपये प्रति १० ग्रॅमवरून आता ९०,३१० रुपयांवर आला. आज सोन्याचा दर ३५ रुपयांनी कमी झाला. तर, चांदी २९०० रुपये प्रति किलोनं स्वस्त झाली असून ९३०५७ रुपयांवर आली. २९ मार्चपासून चार दिवसात चांदी ७८७७ रुपयांनी स्वस्त झाली. तर सोनं प्रति १० ग्रॅम ११४८ रुपयांनी महागलं.

आयबीजेएने जारी केलेल्या दरानुसार २३ कॅरेट सोनं आता ८९,९४८ रुपयांवर आलं आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ८२,६२४ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ६७,७३३ रुपये झालाय.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जातात.

मार्चमध्ये तुफान तेजी

  • १ एप्रिल रोजी सोन्यानं ९१,११५ रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांक गाठला होता.
  • २८ मार्च रोजी सोन्यानं ८९३०६ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीनं १००९३४ रुपये प्रति किलोचा नवा उच्चांक गाठला.
  • २० मार्च रोजी सोन्यानं ८८७६४ रुपये प्रति १० ग्रॅमचा नवा उच्चांक गाठला होता.
  • १९ मार्च २०२५ रोजी सोन्यानं ८८,६८० रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांक गाठला होता.
  • १८ मार्च रोजी सोनं ८८,३५४ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर होतं.
  • १७ मार्च रोजी सोन्यानं ८८,१०१ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर जाऊन १३ मार्चचा विक्रम मोडला होता. चांदी १००४०० च्या नव्या शिखरावर होती.
  • १३ मार्च रोजी सोन्यानं १९ फेब्रुवारीचा विक्रम मोडीत काढत ८६,८४३ रुपयांचा नवा उच्चांक गाठला.
टॅग्स :सोनंचांदी