Join us

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार

By जयदीप दाभोळकर | Updated: April 28, 2025 14:30 IST

Gold Silver Price 28 April: येत्या ३० एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे. परंतु यापूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात आज १६७१ रुपयांची घसरण झाली. पाहा काय आहेत सोन्याचे नवे दर.

Gold Silver Price 28 April: येत्या ३० एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे. परंतु यापूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात आज १६७१ रुपयांची घसरण झाली. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २११ रुपयांनी स्वस्त झाला आहे. आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ९५,४२० रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. तर, चांदी १६७१ रुपयांनी स्वस्त होऊन ९६,०१३ रुपये प्रति किलोवर उघडली. जीएसटीमुळे सोन्याचा भाव आता ९८,२८२ रुपये प्रति १० ग्रॅम तर, चांदीचा भाव ९८,८९३ रुपये प्रति किलो झालाय.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत, ज्यात जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्यांदा सायंकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात.

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे ताजे दर

आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव २११ रुपयांनी घसरून ९५,०३८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव १९३ रुपयांनी घसरून ८७,४०५ रुपये झाला आहे. १८ कॅरेट सोन्याचा भावही १५८ रुपयांनी कमी झाला असून आता तो ७१,५६५ रुपये झाला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव १२३ रुपयांनी कमी होऊन ५५,८२१ रुपये झाला आहे.

वर्षभरात मोठा परतावा

अक्षय्य तृतीयेला मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं. जर तुम्ही २०१५ मध्ये आजच्याच दिवशी सोनं खरेदी केलं असतं तर आज तुमच्या गुंतवणुकीचं मूल्य २००% पेक्षा जास्त वाढलं असतं. २०१५ मध्ये सोन्याचा भाव २६,९३६ रुपये प्रति १० ग्रॅम होता. गेल्या १ वर्षात सोन्याचा भाव ७३,२४० रुपयांवरून ९६,००० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. म्हणजेच या कालावधीत सोन्यानं ३० टक्के परतावा दिलाय.

टॅग्स :सोनंचांदी