Join us

Gold Rate 15 May : एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?

By जयदीप दाभोळकर | Updated: May 15, 2025 13:54 IST

Gold Silver Price 15 May: आज म्हणजेच गुरुवार १५ मे रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. पाहा काय आहेत सोन्याचे नवे दर.

Gold Silver Price 15 May: आज म्हणजेच गुरुवार १५ मे रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव २३७५ रुपयांनी घसरून ९१,४८४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर, चांदी २२७९ रुपयांनी घसरून ९४,१०३ रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (आयबीजेए) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात.

जीएसटीसह आज सोनं ९४,२२८ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ९६,९२६ रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. सराफा बाजारात सोनं आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून ७६१६ रुपयांनी स्वस्त झालंय. २२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याचा भाव ९९,१०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या उच्चांकी पातळीवर होता.

ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?

आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव २३६५ रुपयांनी घसरून ९१,११८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव २१७६ रुपयांनी घसरून ८३,७९९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव १३९० रुपयांनी कमी होऊन ५३,५१८ रुपये झाला आहे.

का घसरताहेत दर?

भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी आणि युरोपमधील रशिया-युक्रेन संघर्षाच्या वृत्तानंतर जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. अमेरिकेनं चिनी वस्तूंवरील शुल्क १४५ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर आणलंय, तर चीननंही अमेरिकन वस्तूंवरील शुल्क १२५ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणलंय. यामुळे जगभरातील शेअर बाजारात तेजी आली आणि लोकांचा 'जोखीम घेण्याचा मूड' तयार झाला. त्यामुळे सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीची मागणी कमी झाली.

टॅग्स :सोनंचांदी