Join us

सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?

By जयदीप दाभोळकर | Updated: July 23, 2025 14:28 IST

Gold Silver Price 23 July: सोने आणि चांदीच्या किमतींनी आज सर्व विक्रम मोडले आहेत. आज सोन्या-चांदीचा भाव जाणून तुम्हाला धक्का बसेल. पाहा काय आहेत आजचे दर.

Gold Silver Price 23 July: सोने आणि चांदीच्या किमतींनी आज सर्व विक्रम मोडले आहेत. आज सोन्या-चांदीचा भाव जाणून तुम्हाला धक्का बसेल. आज, सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम ९९४ रुपयांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, चांदीच्या किमतीत प्रति किलो १००७ रुपयांची वाढ झाली. जीएसटीसह सराफा बाजारात २४ कॅरेट सोनं १,०३,५१७ रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकलं जात आहे, तर चांदी १,१८,९६५ रुपये प्रति किलो दरानं विकली जातेय.

मंगळवारी जीएसटीशिवाय चांदीचा भाव प्रति किलो १,१४,४९३ रुपये आणि सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९९,५०८ रुपये झाला. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १,००,५०२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर, चांदीचा भाव प्रति किलो १,१५,५०० रुपयांवर उघडला.

आजपासून IPO गुंतवणुकीसाठी खुला, लॅपटॉप रिपेअरिंगमधून कोट्यवधी कमावते कंपनी; GMP ₹१०० पेक्षाही जास्त

जुलैमध्ये चांदीत मोठी तेजी

जुलैमध्ये चांदीचा वेग सोन्यापेक्षा खूपच जास्त होता. या काळात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ४६१६ रुपयांनी वाढला, तर चांदीचा भाव ८९८३ रुपयांनी वाढला. आयबीजेए दरानुसार, ३० जून रोजी सोनं प्रति १० ग्रॅम ९५,८८६ रुपयांवर बंद झालं. तर, चांदी १,०५,५१० रुपये प्रति किलो दरानं विकली गेली. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही.

आयबीजेएच्या दरांनुसार आज, २३ कॅरेट सोनंही ९९० रुपयांनी महागलं आणि ते १,००,१०० रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीमुळे त्याची किंमत आता १,०३,१०३ रुपये झाली आहे. यामध्ये मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९२,०६० रुपये आहे. जीएसटीसह त्याची किंमत ९४८२१ रुपये झाली आहे. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ७४६ रुपयांनी वाढून ७५,३७७ रुपये झाला आहे आणि जीएसटीसह तो ७७,६३८ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलाय.

टॅग्स :सोनंचांदी