Join us

तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर

By जयदीप दाभोळकर | Updated: July 4, 2025 15:20 IST

Gold Silver Price 4 July: आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर.

Gold Silver Price 4 July: आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज सोन्याच्या दरात १९५ रुपयांनी तर चांदीच्या दरात २५३ रुपयांनी घसरण झाली आहे. आज ४ जुलै, शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ९७,१४२ रुपये आहे. जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा दर १०००५६ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर १,१०,५८८ रुपये प्रति किलो आहे.

आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोनं देखील १९४ रुपयांनी स्वस्त झालंय आणि ते ९६,७५३ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडलं. जीएसटीसह, त्याची किंमत आता ९९,६५५ रुपये झाली आहे. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याची सरासरी स्पॉट किंमत १७९ रुपयांनी कमी झाली आणि ती ८८,९८२ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडली. जीएसटीसह, त्याची किंमत ९१६५१ रुपये प्रति १० ग्रॅम होईल.

चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?

१८ कॅरेट सोन्याचा भाव

१८ कॅरेट सोन्याची किंमतही १४६ रुपयांनी स्वस्त झाली आहे आणि आता ती ७२,८५७ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. ३% जीएसटीसह, त्याची किंमत ७५,०४२ रुपये होईल. तर, १४ कॅरेट सोन्याची किंमत ११४ रुपयांनी कमी होऊन ५६,८२८ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. त्यात जीएसटी जोडल्यानंतर, ती ५८,५३२ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचत आहे. यामध्ये मेकिंग चार्जेचचा समावेश नाही.

सोने आणि चांदीचे स्पॉट रेट इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारे (IBJA) जाहीर केले जातात. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.

टॅग्स :सोनंचांदी