Join us

Fixed Deposit : आपल्या ऐवजी पत्नीच्या नावे करा एफडी, आहे अनेक फायदे; ऐकून खुश व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 10:42 IST

Fixed Deposit Investment : एफडी हा अजूनही भारतीयांचा पसंतीचा गुंतवणुकीचा पर्याय आहे. अतिशय कमी जोखीम असलेली ही पारंपारिक गुंतवणूक आहे. छोट्या-मोठ्या बँकांपासून ते एनबीएफसीपर्यंत त्यांच्या ग्राहकांनाही एफडीची सुविधा उपलब्ध आहे.

एफडी हा अजूनही भारतीयांचा पसंतीचा गुंतवणुकीचा पर्याय आहे. अतिशय कमी जोखीम असलेली ही पारंपारिक गुंतवणूक आहे. छोट्या-मोठ्या बँकांपासून ते एनबीएफसीपर्यंत त्यांच्या ग्राहकांनाही एफडीची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय कॉर्पोरेट एफडीही प्रचलित आहेत. दरम्यान, एफडीवर व्याजदर तुलनेनं कमी असतो. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीत आपल्याला मिळणारा परतावा महागाईदरापेक्षा जास्त असावा, अन्यथा गुंतवणुकीचा काहीच फायदा होणार नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

एफडीच्या व्याजावर टीडीएस

मुदत ठेवींमधून म्हणजेच एफडीतून मिळणाऱ्या व्याजावर ग्राहकांना टीडीएस भरावा लागतो. अशावेळी एफडीतून मिळणारी कमाई तुमच्या एकूण कमाईशी जोडली जाईल. अशावेळी तुम्हाला जास्त कर भरावा लागू शकतो. पण जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर एफडी केली तर तुम्ही हा टॅक्स वाचवू शकता. 

जर तुम्हाला तुमच्या पत्नीच्या नावावर एफडी केली तर तुम्हाला फायदा होईल. बहुतेक स्त्रिया कमी कराच्या कक्षेत येतात. तर दुसरीकडे जर तुमची पत्नी गृहिणी असेल तर त्यांच्यावर कोणतंही कर दायित्व नसतं. अशावेळी जर तुम्हाला तुमच्या पत्नीच्या नावावर एफडी करता आली तर तुमची टीडीएस भरण्यापासून बचत होईल. यामुळे तुम्ही जास्त कर भरणं देखील टाळू शकता.

टीडीएस कधी कापला जातो?

जर एका आर्थिक वर्षात एफडीवरील व्याज ४०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला १०% टीडीएस भरावा लागेल. जर तुमच्या पत्नीचं उत्पन्न कमी असेल तर ती फॉर्म १५ जी भरून टीडीएस पेमेंट टाळू शकते. तुम्ही तुमच्या बायकोसोबत जॉइंट एफडी करून तुमच्या बायकोला फर्स्ट होल्डर बनवलं तरी तुम्ही टीडीएस भरण्याबरोबरच जास्त टॅक्स भरणंही टाळू शकता.

टॅग्स :गुंतवणूकबँक