FD vs Mutual Fund: आर्थिक नियोजनात इमर्जन्सी फंड हा प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. अचानक येणारे खर्च, जसे की वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, नोकरी जाणे किंवा घरातील तातडीची कामे...यांना सामोरे जाण्यासाठी हा निधी उपयोगी ठरतो. मात्र, हा फंड कुठे गुंतवावा? फिक्स्ड डिपॉझिट मध्ये की, म्युच्युअल फंड मध्ये, याबाबत अनेक गुंतवणूकदार संभ्रमात आहेत.
FD: सुरक्षित पण मर्यादित लिक्विडिटी
Fixed Deposit (FD) हा पारंपरिक आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. यात परतावा (रिटर्न) निश्चित असतो आणि मूळ रक्कम सुरक्षित राहते.
फायदे:
निश्चित आणि स्थिर परतावाकमी जोखीम सुरक्षित गुंतवणूक
तोटे:
पैसे ठराविक कालावधीसाठी लॉक होऊ शकतातमुदतीपूर्वी पैसे काढल्यास दंड लागू शकतोव्याजावर कर लागू होतो, त्यामुळे प्रत्यक्ष परतावा कमी होतो
म्युच्युअल फंड: जास्त लिक्विडिटी, थोडा धोका
Mutual Fund विशेषतः लिक्विड फंड किंवा डेट फंड, इमर्जन्सी फंडसाठी पर्यायी पर्याय ठरू शकतात.
फायदे:
उच्च लिक्विडिटी (१-२ दिवसांत पैसे काढता येतात)FD पेक्षा काही वेळा जास्त परतावा मिळण्याची शक्यतातुलनेने कमी जोखीम (इक्विटी फंडपेक्षा कमी)
तोटे:
बाजाराशी संबंधित काही प्रमाणात धोका परतावा निश्चित नसतो
इमर्जन्सी फंडचा उद्देश काय?
तज्ज्ञांच्या मते, इमर्जन्सी फंडचा मुख्य उद्देश उच्च परतावा मिळवणे नसून, सुरक्षितता आणि तात्काळ उपलब्धता सुनिश्चित करणे हा आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना जोखीम आणि लिक्विडिटी यांचा समतोल साधणे महत्त्वाचे ठरते.
योग्य स्ट्रॅटेजी कोणती?
आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की, इमर्जन्सी फंड एकाच ठिकाणी ठेवू नये. त्याऐवजी तो विभागून ठेवणे अधिक फायदेशीर ठरते. काही रक्कम सेव्हिंग अकाउंटमध्ये (तात्काळ गरजेसाठी), काही रक्कम FD मध्ये (सुरक्षितता आणि स्थिर परतावा), तर उर्वरित रक्कम लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये (जलद उपलब्धता) गुंतवावी.
Web Summary : For emergency funds, balance safety and liquidity. FDs offer security, while liquid mutual funds provide quicker access and potentially higher returns. Experts advise diversifying across savings accounts, FDs, and liquid funds.
Web Summary : इमरजेंसी फंड के लिए सुरक्षा और तरलता को संतुलित करें। एफडी सुरक्षा प्रदान करते हैं, जबकि लिक्विड म्यूचुअल फंड त्वरित पहुंच और संभावित रूप से अधिक रिटर्न प्रदान करते हैं। विशेषज्ञ बचत खातों, एफडी और लिक्विड फंडों में विविधता लाने की सलाह देते हैं।