Join us
Daily Top 2Weekly Top 5

FD-RD काहीच नाही! एलआयसीच्या 'या' योजनेत २४३ रुपयांची गुंतवणूक करा, मिळेल ५४ लाखांचा फंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:10 IST

LIC Investment Scheme: आपल्या आयुष्यात आपण नेहमीच अशा एखाद्या पॉलिसीच्या शोधात असतो जिथे पैसे बुडण्याची भीती नसेल आणि हळूहळू एक मोठा निधीही तयार होईल. पाहूया कोणती आहे ही एलआयसीची पॉलिसी.

LIC Investment Scheme: आपल्या आयुष्यात आपण नेहमीच अशा एखाद्या पॉलिसीच्या शोधात असतो जिथे पैसे बुडण्याची भीती नसेल आणि हळूहळू एक मोठा निधीही तयार होईल. जर तुम्हाला तुमची गुंतवणूक सुरक्षित ठेवून गरजेच्या वेळी बँक बॅलेन्ससारखा आधार हवा असेल, तर एलआयसीची (LIC) 'जीवन लाभ' पॉलिसी हा एक दमदार पर्याय आहे. ही योजना सुरक्षा, बचत आणि विश्वास यांचे एकत्रित मिश्रण आहे. भारतातील लाखो लोक आजही एलआयसीवर डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि हाच विश्वास या प्लॅनची सर्वात मोठी ताकद आहे.

काय आहे एलआयसी जीवन लाभ पॉलिसी?

ही पॉलिसी खास अशा लोकांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांना मार्केटमधील चढ-उतार आवडत नाहीत आणि ज्यांना आपला पैसा निश्चितपणे परत हवा असतो. हे एक नॉन-लिंक्ड, लिमिटेड प्रीमियम पेमेंट आणि विथ-प्रॉफिट प्लॅन आहे. याचा अर्थ असा की, पॉलिसीधारकाला केवळ काही ठराविक वर्षांपर्यंतच प्रीमियम भरावा लागतो, परंतु सुरक्षा मात्र मॅच्युरिटीपर्यंत मिळते. पॉलिसी कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, कुटुंबाला वार्षिक प्रीमियमच्या १० पट रक्कम मिळू शकते, जी एकूण भरलेल्या प्रीमियमच्या किमान १०५% असते. मॅच्युरिटीवर पॉलिसीधारकाला विम्याची रक्कम (Sum Assured) + बोनस + अतिरिक्त बोनस अशी एकरकमी रक्कम मिळते. तसंच, अचानक पैशांची गरज भासल्यास या पॉलिसीवर कर्ज सुविधाही उपलब्ध आहे.

'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत

पात्रता आणि गुंतवणुकीचे पर्याय

एलआयसी जीवन लाभ योजना ८ वर्षे ते ५९ वर्षे वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात. यामध्ये किमान विम्याची रक्कम २,००,००० रुपये निश्चित करण्यात आली असून, कमाल मर्यादेला कोणतेही बंधन नाही. ही पॉलिसी तीन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे:

१६ वर्षांचा टर्म – १० वर्षे प्रीमियम भरणं

२१ वर्षांचा टर्म – १५ वर्षे प्रीमियम भरणं

२५ वर्षांचा टर्म – १६ वर्षे प्रीमियम भरणं

गुंतवणूकदार आपल्या सोयीनुसार मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकतात.

५४ लाख रुपयांचा निधी कसा तयार होईल?

समजा, एका २५ वर्षीय तरुणाने २०,००,००० रुपयांच्या विम्यासह २५ वर्षांच्या मुदतीची पॉलिसी घेतली आणि १६ वर्षे प्रीमियम भरण्याचा पर्याय निवडला. यासाठी त्याला वार्षिक सुमारे ८८,९१० रुपये म्हणजेच दररोज सुमारे २४३ रुपयांची बचत करावी लागेल. जेव्हा या पॉलिसीची २५ वर्षे पूर्ण होतील, तेव्हा त्याला मॅच्युरिटीवर सुमारे ५४ लाख रुपयांचा निधी मिळू शकतो. अशा प्रकारे छोटी गुंतवणूक काळासोबत मोठ्या भांडवलात बदलू शकते.

हा प्लॅन का आहे खास?

एलआयसी जीवन लाभ पॉलिसी अशा कुटुंबांसाठी उत्तम आहे ज्यांना सुरक्षित गुंतवणूक, मुलांचे भविष्य, निवृत्ती आणि आपत्कालीन निधी या सर्वांचे नियोजन एकाच ठिकाणी करायचं आहे. यात नुकसानीची भीती कमी आणि सुरक्षिततेसह बचतीचा लाभ जास्त मिळतो.

(टीप: यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीपूर्वी या क्षेत्रातील जाणकाराचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : LIC's 'Jeevan Labh': Invest ₹243, Get ₹54 Lakh Fund!

Web Summary : LIC's Jeevan Labh policy offers security and savings. Invest a small daily amount for a substantial maturity fund. It's ideal for long-term financial planning, providing both insurance coverage and potential returns.
टॅग्स :एलआयसीगुंतवणूक