EPFO UPI Facility: तुम्ही सरकारी किंवा कोणत्याही खाजगी क्षेत्रात काम करत असाल आणि तुमचा PF दर महिन्याला कापला जात असेल, तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आता UPI द्वारे पीएफ दाव्याची(क्लेम) प्रक्रिया वेगवान करणार आहे.
कामगार आणि रोजगार सचिव सुमिता डावरा यांनी सोमवारी सांगितले की, UPI मे महिन्याच्या अखेरीस EPFO प्रणालीमध्ये जोडले जाईल. याचा फायदा 7.5 कोटी सक्रिय EPF सदस्यांना होईल. त्यांना त्यांचे पैसे PF खात्यात त्वरित हस्तांतरित करता येतील.
काय असेल नवीन यंत्रणा?1 लाख रुपयांपर्यंतचे क्लेम आधीच ऑटोमेडेड आहेत, आता ते UPI मुळे आणखी फास्त होतील. याशिवाय, खातेधारक EPFO खाते त्यांच्या UPI ॲप्सशी लिंक करू शकतील (जसे की PhonePe, Google Pay, Paytm). ऑटो-क्लेम सुविधा देखील उपलब्ध असेल. म्हणजे सभासद पात्र असल्यास लगेच पैसे जमा केले जातील. आत्तापर्यंत दाव्याच्या प्रक्रियेस 3 दिवस लागतात, UPI नंतर तुम्हाला काही मिनिटांत पैसे मिळतील.
डेटाबेस आणि पेन्शन प्रणाली सुधारणा
EPFO ने प्रथमच केंद्रीकृत डेटाबेस तयार केला आहे, जो पूर्णपणे स्थिर होण्यासाठी 2-3 आठवडे लागतील.
78 लाख पेन्शनधारकांना आता कोणत्याही बँकेतून पेन्शन मिळू शकेल (पूर्वी फक्त काही बँकांना सूचित केले गेले होते).
आरबीआयच्या सल्ल्याने केंद्रीकृत पेन्शन प्रणाली लागू करण्यात आली आहे.
रोजगाराशी संबंधित नवीन योजना
एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह (ELI) योजनेचे बजेट 10,000 कोटी रुपयांवरून 20,000 कोटी रुपये करण्यात आले आहे. नोकरदार युवक, विद्यमान कर्मचारी आणि प्लॅटफॉर्म कामगारांना याचा फायदा होणार आहे. प्लॅटफॉर्म कामगारांना ऑनलाईन PMJAY योजनेअंतर्गत मोफत आरोग्य विमा देखील मिळेल.
UPI सुविधा कधी उपलब्ध होईल?नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून सूचना घेतल्यानंतर EPFO ने हा प्रस्ताव तयार केला आहे. मे महिन्याच्या अखेरीस फ्रंटएंड चाचणीनंतर UPI लॉन्च केले जाईल. आतापर्यंत एटीएममधून पीएफचे पैसे काढण्याची चर्चा सुरू होती. मात्र, आता पीएफ खाते थेट यूपीआयशी जोडले जाईल. म्हणजेच, लोकांना एटीएमची गरजच भासणार नाही.